मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्द लखनौ सुपर जायंट्सने (LSG) वीस धावांनी विजय मिळवलाय. लखनौच्या संघाने गोलंदाजांच्या दमावर विजय मिळवल्यामुळे लखनौ आता पॉईंट्स टेबलमध्ये आगेकूच केलीय. लखनौच्या 154 धाावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला वीस ओवरमध्ये 133 धावाच बनवता आल्या. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 28 चेंडूत 32 धावा काढल्या. यात त्याने 5 चौकार मारले. तर मयंक अग्रवालने 17 चेंडूत 25 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर ऋषी धवनने 22 चेंडूत 21 धावा काढल्या. त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही आणि 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया.
ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 499 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. त्याने 374 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी 307 धावा काढणारा शिखर धवन आहे. चौथ्या स्थानी हार्दिक पांड्या आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 305 धावा काढल्या आहेत. तर पाचव्या स्थानी श्रेयस अय्यर असून त्याने 290 धावा काढल्या आहेत.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं. संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती डी कॉकला झेलबाद केलं. डी कॉकने बाद होण्याआधी 37 चेंडूत 46 धावा काढल्या.
डी कॉकची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून 6 विकेट घेतल्या. रबाडाने 4 आणि चहरने दोन गडी बाद केले होते.