मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना झाला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं कालच्या सामन्यात सहावा विजय मिळवलाय. चेन्नई सुपर किंग्सला नमवून RCBनं दोन महत्त्वपूर्ण पॉइंटस मिळवले आहे. प्लेऑफच्या (Playoff) दिशेने एक दमदार पाऊल टाकलं आहे. या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. आरसीबीने हा सामना 13 धावांनी जिंकला. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात आठ बाद 173 धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super kings) विजयासाठी 174 धावांचे टार्गेट होते. पण त्यांना आठ बाद 160 धावाच करता आल्या. चेन्नई खराब खेळ केला असं नाहीय. पण बँगलोरने फलंदाजी आणि गोलंदाजीत सीएसके पेक्षा जास्त चांगला खेळ दाखवला, त्यामुळे ते जिंकले. आरसीबीने सांघिक प्रदर्शनाच्या बळावर विजय मिळवला. चेन्नईचा स्पर्धेतील हा सातवा पराभव आहे. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काय बदल झालाय ते पाहुया…
कालच्या विजयानंतरही डु प्लेसिस ऑरेंज कॅपमध्ये टॉप फाईव्ह बाहेर आहे. तर जॉस बटलरचं ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिलं स्थान काय आहे. जोस बटलर पहिल्या स्थानी असून त्याने आतापर्यंत 588 धावा काढल्या आहे. केएल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर असून 451 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनने आगेकूच केली आहे. त्याने 369 धावा काढल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. त्याने 324धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने 324 धावा आतापर्यंत काढल्या आहेत.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
विराटने काल चांगली सुरुवात केली. त्याने काही चांगले फटके खेळले. पण धोनीने मोइन अलीला गोलंदाजीला आणलं. त्याने त्याच्या एक अप्रतिम चेंडूवर कोहलीच्या बेल्स उडवल्या. खरंच हा जादुई चेंडू होता. मोइन अलीने ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर चेंडू टाकला. त्याने कोहलीला ड्राइव्ह करण्याासठी निमंत्रित केलं. चेंडू कोहलीच्या बॅट मधून गेला व थेट दांड्या उडवल्या.