मुंबई : टीम इंडियाच्या फलंदाजांनी गेल्या 2 महिन्यात एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला. आधी इशान किशन याने बांगलादेश विरुद्ध हा कारनामा केला. इशान सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारा फलंदाज ठरला. तर यानंतर शुबमन गिल यानेही न्यूझीलंड विरुद्ध डबल सेंच्युरी केली. शुबमन द्विशतक करणारा युवा बॅट्समन ठरला. आता यानंतर एका फलंदाजाने द्विशतक केलंय.
अंडर 19 वर्ल्ड कप 2020 मध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलेल्या फलंदाजाने द्विशतक केलंय. सी के नायडू स्पर्धेत मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अर्थव अंकोलेकर याने हा कारनामा केला आहे.
अथर्वने 249 बॉलमध्ये 214 धावांची खेळी केली. अर्थवने यामध्ये 15 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकार ठोकले. याशिवाय मुशीर खान याने त्रिशतक ठोकलं. मुशीर खान याने 339 धावा केल्या.
या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर मुंबईने 8 विकेट्स गमावून 704 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर हैदराबादने दुसऱ्या दिवसापर्यंत 3 विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे अजून 581 धावांची मजबूत आघाडी आहे.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अथर्व अंकोलेकर (कर्णधार), खिजार दाफेदार, भुपेन लालवानी, जसप्रीत रंधवा, वरुण लवांडे, जयेश पोखरे, सुयांश शेडगे, वैभव कलामकार (विकेटकीपर), सक्षण, मुशीर खान आणि हिमांशू सिंह.
हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : बी रतन तेजा, पृथ्वी, ऋषभ बसलास, श्रुंजीथ रेड्डी, ए सिम्हा (कॅप्टन), हिमतेजा के, अन्नाम राव, एम धनुष, के रेड्डी आणि व्ही सहासर.