मुंबई : आयपीएलच्या लिलावाला अवघे काही दिवस बाकी असताना एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल लिलवात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू एका जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे. डॉक्टारांनी तो फक्त 12 वर्षे जगेल असं सांगितलं होतं. आता या आजाराच्या दुसऱ्या स्टेजमध्ये हा स्टार खेळाडू असल्याने त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाही. या आजारपणाबाबत स्वत: खेळाडूने खुलासा केल्याने क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाचा हा स्टार खेळाडू असून त्याला आता सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं नाही. इंग्लंडमध्येही या खेळाडूच्या जागेवर मिचेल मार्श याची संघात निवड करण्यात आली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवा स्टार ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन आहे. या आजारासंदर्भात ‘7 क्रिकेट’ला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरून ग्रीने स्वत: खुलासा केला आहे.
‘क्रोनिक किडनी डिसीज’ असं या आजाराचं नाव असून 19 आठवड्यांच्या गरोदरपणात ग्रीनची आई बी ट्रेसीने स्कॅन केले तेव्हा ग्रीनच्या आजाराची माहिती मिळाली होती. युरेथ्रल व्हॉल्व्हमध्ये अडथळे आल्याने लघवीचा प्रवाह किडनीमध्ये परत येतो. ग्रीनची किडनी इतर किडन्यांसारखी शरारीतील रक्त फिल्टर करण्याचं काम करत नाही. फक्त 60 टक्के रक्त फिल्टर होतं जी आजाराची दुसरी स्टेज आहे. क्रोनिक किडनी डिसीजचे पाच टप्पे आहेत. स्टेज 1 हा सर्वात कमी गंभीर आहे आणि स्टेज 5 मध्ये ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस आवश्यक असतं.
मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो. कारण मला मला किडनीच्या आजाराचा जास्त त्रास झाला नाही. जितका इतरांना त्याच गोष्टीचा त्रास होतो. मला गेल्या वर्षी केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळताना त्रास झाला होता. एक इनिंग फिल्डिंग, पाच ओव्हर बॉलिंग आणि नाबाद 89 धावांवर असताना मला त्रास जाणवल्याचं ग्रानने सांगितलं.
Cameron Green has chronic kidney disease.
There are five stages to it, with the fifth stage requiring a transplant or dialysis.
This is how Green – currently at stage two – manages the condition every day… pic.twitter.com/ikbIntapdy
— 7Cricket (@7Cricket) December 14, 2023
दरम्यान, मागील आयपीएलच्या सीझनमध्ये ग्रीनला 17. 50 कोटी रूपयांना लिलावामध्ये खरेदी केलं होतं. मात्र यंदाच्या मोसमात मुंबईने ग्रीनला सोडलं असून आरसीबी संघाने त्याला ट्रेड केलं आहे. ग्रीनने आयपीएल 2023 मध्ये 16 सामने खेळले, 50.22 च्या सरासरीने आणि 160.28 च्या स्ट्राइक रेटने 452 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.