टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाला पंजाबी बोलताच भरावा लागतो दंड, असं का ते जाणून घ्या

| Updated on: Jun 11, 2024 | 8:36 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. यानंतर क्रीडारसिकांना सुपर 8 फेरीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे कोणते संघ सुपर 8 फेरीत पोहोचणार याची उत्सुकता आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाला पंजाबी बोलणं चांगलंच महागात पडत आहे. हा संघ दुसरा तिसरी कोणता नसून कॅनडा आहे.

टी20 वर्ल्डकप खेळणाऱ्या संघाला पंजाबी बोलताच भरावा लागतो दंड, असं का ते जाणून घ्या
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु आहे. या सामन्यातील विजय पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांचा नजरा या सामन्याकडे लागून आहे. कॅनडाने हा सामना जिंकला तर पाकिस्तानला आपा बोजा बिस्तरा गुंडाळावा लागणार आहे. असं असताना कॅनडाच्या खेळाडूंना भलत्याच गोष्टीचा त्रास होत आहे. कॅनडा संघात अधिकांश पंजाबी खेळाडू आहेत. त्यामुळे हे खेळाडू कायम पंजाबी भाषेत बोलणं पसंत करतात. पण असं करणं त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. कॅनडा संघात भारत, पाकिस्तान आणि कॅरेबियन वंशाचे खेळाडू आहेत. त्यामुळे आपल्या मातृभाषेत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण दोन पेक्षा जास्त खेळाडू अशी भाषा बोलत असतील आणि इतरांना ती कळत नसेल तर संघात गट पडतात. हीच बाब लक्षात ठेवून कॅनडा संघात पंजाबी बोलण्यावर दंड आकारला जातो.

कॅनाडा संघातील खेळाडू नवनीत धालिवालने क्रिकइंफोशी बोलताना सांगितलं की, “आमच्या तोंडून तर पंजाबीच भाषा निघते. त्यामुळे खूपच कठीण होऊन बसलं आहे. आम्हाला वारंवार दंड भरावा लागत आहे.” कॅनडा संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आयर्लंडला पराभूत करत उलथापालथ केली आहे. दुसरीकेड नासाऊ काउंटीमध्ये सर्वात मोठा स्कोअर करणारा संघ आहे. या मैदानात भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश हे संघ खेळले आहेत. पण कॅनडाची कामगिरी विलक्षण आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आव्हान ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला असून कॅनडला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.