Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह इज बॅक, आयर्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके

| Updated on: Aug 18, 2023 | 8:14 PM

Jasprit Bumrah 2 Wickets | जसप्रीत बुमराह याने आयर्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके देत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह इज बॅक, आयर्लंडला  पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके
Follow us on

डब्लिन | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन जसप्रीत बुमराह याने आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बुमराहने दुखापतीनंतर 11 महिन्यांनी टीममध्ये कमबॅक केलं. तसेच रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी पदार्पण केलं. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाकडून पहिली ओव्हर टाकली. बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये धारधार बॉलिंगने आयर्लंडला 2 झटके देत शानदार कमबॅक केलं.

आयर्लंडचा ओपनर क्लिन बोल्ड

हे सुद्धा वाचा

पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के

बुमराह सामन्यातील आणि आपल्या स्पेलमधील पहिली ओव्हर टाकायला आला. आयर्लंडकडून अँड्रयू बालबर्नी आणि कॅप्टन पॉल स्टर्लिंग ही सलामी जोडी मैदानात आली. बुमराहने टाकलेल्या पहिल्या बॉलवर अँड्रयूने फोर मारला. मात्र दुसऱ्याच बॉलवर बुमराह जोरदार कमबॅक केला. बुमराहने परफेक्ट इन स्विंग टाकत अँड्रयूला क्लिन बोल्ड केला.

त्यानंतर पाचव्या बॉलवर बुमराहने लॉर्कन टकर याला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. टकरला भोपाळाही फोडता आला नाही.

जसप्रीत बुमराह याचा डबल धमाल

टीममध्ये 11 महिन्यांनी कमबॅक

दरम्यान आयर्लंड विरुद्धच्या या पहिल्या सामन्यातून जसप्रीत बुमराह 11 महिन्यांनी टीम इंडियात परतला. बुमराहला दुखापतीमुळे आणि त्यानंतर सावरायला तब्बल 11 महिने लागले. बुमराह याने अखेरचा टी 20 सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 25 सप्टेंबर 2022 रोजी खेळला होता.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.

आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.