शेवटच्या कसोटी सामन्याबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला..

| Updated on: Dec 30, 2024 | 2:11 PM

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला. या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. पुढचं समीकरण पाहता कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं.

शेवटच्या कसोटी सामन्याबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला..
Follow us on

चौथ्या कसोटी सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं होतं. चौथ्या दिवशीही भारताने चांगली कामगिरी केली होती. पण शेवटच्या सत्रात गणित बिघडलं आणि पाचव्या दिवशी फलंदाजीत सर्व काही गमावलं. ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी  सामन्यांच्या मालिकेच चौथ्या सामन्यातील विजयानंतर 2-1 ने आघाडी घेतली आहे. यामुळे आता भारताकडे मालिका वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणितही बिघडलं आहे. अंतिम फेरीचं स्वप्न जवळपास भंगलं आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा नाराज दिसला. आता या मालिकेतील पाचवा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माने खास प्लान आखला आहे.

‘सिडनी कसोटी सामन्यात आम्हाला वलयाबाहेर येत एक टीम म्हणून चांगलं करण्याची संधी आहे.आम्ही हा सामना चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू.’, असं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. तसेच मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं. तसेच त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही हे देखील अधोरेखित केलं.

‘बुमराह खरंच चांगला गोलंदाज आहे. आपण त्याला अनेक वर्षांपासून पाहात आहात. येथेही त्याची कामगिरी पाहात आहात. तो फक्त देशासाठी खेळू इच्छित आहे. टीमसाठी त्याला चांगलं खेळायचं आहे. पण दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने मदत होत नाही.’, असं रोहित शर्मा बुमराहबाबत म्हणाला.

दुसरीकडे, रोहित शर्माने स्वत:च्या फलंदाजीबाबतही मत व्यक्त केलं. ‘मी आज तिथेच उभा आहे जिथे होतो. कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही निकाल बाजूने आले नाहीत. हे निराशाजनक आहे. मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे. पण आतापर्यंत ते तिथेच आहे. एक टीम म्हणून आम्हाला काही गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.’, असं रोहित शर्मा म्हणाला.

बातमी वाचा : 9, 0, 5…! भारताच्या दिग्गज खेळाडूंची महत्वाच्या सामन्यात खेळी, रोहित-विराटच्या खेळीमुळे क्रीडाप्रेमींचा संताप

बातमी वाचा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं, आता असं आहे समीकरण