नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी धमाकेदार कामगिरी केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं आहे. रोहितने चौकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. रोहितने 171 चेंडूंचा सामना करत शतक जमवलं. रोहितने या शतकी खेळीत 2 सिक्स आणि 14 चौकार लगावले. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील एकूण नववं तर कर्णधार म्हणून हे पहिलंच शतक ठरलं. रोहितच्या या शतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या डावाला स्थिरता मिळाली. तसेच पहिल्या डावात भारताने आघाडीही घेतली.
रोहितने या शतकासह वनवास संपवला. रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 डिसेंबर 2014 रोजी पहिली कसोटी मॅच खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 कसोटी डावात खेळला आहे. मात्र त्याला शतक ठोकण्यात यश आलं नाही. पण नागपूर कसोटीत रोहितने तो कारनामा केलाच. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 15 व्या डावात तब्बल 2 हजार 985 दिवसांनी शतक केलं.
रोहितने या शतकासह आणखी एक पराक्रम केला. हा पराक्रम टीम इंडियाच्या कोणत्याही कर्णधाराला जमला नाही. रोहित वनडे, टी 20 आणि कसोटीत शतक ठोकणारा कर्णधार ठरला. बीसीसीआयने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
रोहित शर्माचं झुंजार शतक
Milestone Unlocked ?
A special landmark ? ?@ImRo45 becomes the first Indian to score hundreds across Tests, ODIs & T20Is as #TeamIndia captain ? pic.twitter.com/YLrcYKcTVR
— BCCI (@BCCI) February 10, 2023
टीम इंडियाने 1 बाद 77 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. तेव्हा रोहित आणि आर अश्विन मैदानात होते. अश्विन मैदानात सेट झाला होता. मात्र 23 धावांवर रोहित आऊट झाला.
टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने निराशा केली. पुजारा 7 धावा करुन माघारी परतला. विराट कोहली यालाही विशेष करता आलं नाही. विराटने 12 धावा केल्या. पदार्पणणीवर सूर्यकुमार यादव याला छाप सोडता आला नाही. सूर्यकुमार लायनचा शिकार झाला. तो 8 रन्स करुन मैदानाबाहेर गेला.
मात्र रोहित दुसऱ्या बाजूला खिंड लढवत होता. या दरम्यान रोहितने शतक ठोकलं. त्यामुळे टीम इंडियाला स्थिरता मिळाली तसेच 177 धावांचं आव्हान पूर्ण करुन आघाडी घेता आली.
इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.