राजकोट | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला अखेर 8 डावांमध्ये अपयशी ठरल्यानंतर निर्णायक आणि योग्य वेळेस सूर गवसला आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र कॅप्टन रोहितने लोकल बॉय रवींद्र जडेजा याच्यासोबत टीम इंडियाचा डाव सावरत झुंजार अर्धशतक झळकावलं. रोहितच्या या शतकामुळे टीम इंडियाच्या डावाला स्थिरता मिळाली.
कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहितने तिसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले. सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी पदार्पण केलं. तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा या दोघांचं कमबॅक झालं. टॉसनंतर टीम इंडियाची यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. यशस्वीने चौकार ठोकून जोरदार सुरुवात केली. दोघेही आश्वासक सुरुवात करुन देतील असं वाटत होतं. मात्र टीम इंडियाचा स्कोअर 22 असताना यशस्वी 10 धावा करुन आऊट झाला.
यशस्वीनंतर शुबमन गिल 9 बॉलमध्ये एकही धाव न करता आला तसाच परत गेला. शुबमनला भोपळाही फोडता आला नाही. शुबमननंतर काही ओव्हरनंतर रजत पाटीदार हा देखील आऊट झाला. रजतने 5 धावा केल्या. रजतनंतर लोकल बॉय रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने जबाबदारीने रोहितला चांगली साथ दिली. रोहितनेही एक बाजू लावून धरत 8 डावांनंतर अर्धशतक ठोकलं. रोहितने 71 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 71.83 च्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचं कसोटी कारकीर्दीतील हे 17 वं आणि इंग्लंड विरुद्धचं चौथं अर्धशतक ठरलं.
रोहितचं 8 डावांनंतर अर्धशतक
5⃣0⃣ for captain Rohit Sharma! 👏 👏
His 17th Test fifty as #TeamIndia move past 80.
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @ImRo45 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fOrJssYKcs
— BCCI (@BCCI) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.