IND vs ENG : इग्लंडला पराभूत केल्यावर रोहितने विराट, गिल आणि अय्यर यांना झापलं, म्हणाला…

| Updated on: Oct 29, 2023 | 10:49 PM

IND vs ENG : भारताने वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला 100 धावांंनी पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळलेली, यामध्ये प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना रोहित शर्मा याने सामना संपल्यानंतर झापलं.

IND vs ENG : इग्लंडला पराभूत केल्यावर रोहितने विराट, गिल आणि अय्यर यांना झापलं, म्हणाला...
Follow us on

मुंबई :  वर्ल्ड कप 2023मधील भारत आण इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 100 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. भारताला 229 धावांवर गुंडाळल्यावर भारतीय गोलंदाजांनी वर्ल्ड कप विजेत्या संघाला अवघ्या 129 धावांवर गुंडाळलं. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड कपमधील सलग सहावा विजय मिळवला आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासमोर इंग्लंड संघाने अक्षरक्ष: गुडघे टेकले. इंग्लंडला पराभूत करत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये टॉप मारला आहे. सामना संपल्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया देताना काही खेळाडूंना झापलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

संघात अनेक अनुभवी खेळाडूंनी आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलं, आज पहिल्यांदा बॅटींग करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी आव्हान दिलेलं पण आम्हाला फाईटिंग टोटलपर्यंत पोहोचायचं होतं. सामना जिंकला असला तरीसुद्धा मला वाटतं की 30 धावा कमी पडल्या. पहिल्या तीन विकेट जाणं ही चांगली गोष्ट नव्हती, तिघांनीही आपल्या विकेट फेकल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

सामन्याला सुरूवात करताना विरोधी संघावर दबाव टाकण्यासाठी पहिल्या दोन विकेट घ्याव्या लागतात. त्यासाठी वेगवान गोलंदाजांवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आज गोलंदाजांनी योग्य लेंथवर गोलंदाजी केली आणि त्याचाच फायदा झाला. आमचा संघ हा संतुलित संघ असून गोलंदाजीमध्ये अनेक पर्याय आणि अनुभवी खेळाडू आहेत मात्र फलंदाजांनी धावा करणं गरजेचं असल्याचं रोहितने सांगितलं.

श्रेयस अय्यर याला त्याचा इगो मध्ये येत असल्यासारखं झालं. विरोधी संघातील गोलंदाजा त्याला बाऊंन्सर टाकतात आणि अय्यर मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट होतं आहे. आजच्या सामन्यातही तसंच झालं कारण संघ अडचणीत असताना त्याने विकेटवर थांबणं गरजेचं होतं. मात्र आजही अवघ्या चार धावा काढून तो परतला. विराटही आक्रमपणे खेळायला गेला आणि आपली विकेट गमावूव बसला. त्यामुळेच सुरूवातीच्या तिघांनी विकेट फेकल्याचं रोहित सामन्यानंतर म्हणाला.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड