बंगळुरु | वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु टीमची कर्णधार सांगलीकर स्मृती मंधाना हीने तडाखेदार खेळी केलीय. स्मृतीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 195 धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली आहे. स्मृतीने सोफी सोफी डेव्हाईन हिच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करुन टीमला चांगली आणि आश्वसक सुरुवात करुन दिली. त्यानंतर सोफी डेव्हाईन 23 धावा करुन आऊट झाली. मात्र स्मृतीने कॅपटन्सी खेळी केली.
स्मृतीने चाबूक बॅटिंग करत वूमन्स प्रीमिअर लीगमधील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. स्मृती अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाली. स्मृतीने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. स्मृती या बेझबॉल स्टाईल बॅटिंगमध्ये यशस्वी ठरली. तिने आरसीबीसाठी वेगाने धावा केल्या. मात्र एका बॉलने सामना फिरला. स्मृती फटकेबाजीच्या नादात आरसीबीच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये आऊट झाली. मारिझान काप हीने स्मृतीला क्लिन बोल्ड केलं. दिल्लीने निर्णायक क्षणी स्मृतीची विकेट काढली.
स्मृतीने 43 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली. स्मृतीने 172. 09 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. स्मृतीच्या या खेळीत 3 सिक्स आणि 10 चौकारांचा समावेश होता. अर्थात स्मृतीने 13 बॉलमध्ये 58 धावांचा फडशा पाडला. दरम्यान त्याआधी दिल्ली कॅपिट्लसने शफाली वर्मा हीच्या 50 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावांपर्यंत मजल मारली.
स्मृती मंधानाची झंझावाती फलंदाजी
Leading the charge for #RCB! 🤩
Captain Smriti puts her team on course for a record chase with her first-ever #TATAWPL 5⃣0⃣ ⚡#RCBvDC #TATAWPLonJioCinema #TATAWPLonSports18 #HarZubaanParNaamTera#JioCinemaSports #CheerTheW pic.twitter.com/w9MRQlvFpl
— JioCinema (@JioCinema) February 29, 2024
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेईंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव आणि शिखा पांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेईंग इलेव्हन | स्मृती मंधाना (कॅप्टन), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.