वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रहकीम कॉर्नवाल हा कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत बार्बाडोस रॉयल्स संघाकडून खेळत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रहकीम सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वजनदार खेळाडू आहे. त्याचं वजन जवळपास 140 किलोच्या आसपास आहे. त्यामुळे त्याची शरीरयष्टी पाहून आधीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याची फिल्डिंग आणि फलंदाजी पाहून आवाक् होणं सहाजिकच आहे. पण त्याची फिल्डिंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या स्पर्धेतील 13वा सामना बार्बाडोस रॉयल्स आणि अँटिगुआ अँड बारबुडा फाल्कन्स यांच्यात झाला. या सामन्यात रहकीम कॉर्नवलने जबरदस्त फिल्डिंग करत उपस्थितांची दाद मिळवली. बार्बाडोस रॉयल्सने सोशल मीडियावर याबाबतची माहिती शेअर केली आहे. व्हिडीओत पाहू शकता की अँटिगुआ अँड बारबुडा अँटिगुआच्या फलंदाजाने फाईन लेगला हलक्या हाताने मारला.
चेंडू फाईन लेगला चौकाराच्या दिशेने जात असल्याचं पाहून रहकीम कॉर्नवालने धाव घेतली. इतकं वजनदार शरीरयष्टी घेऊन धावताना पाहून चेंडू अडवेल की नाही याबाबतच अनेकांना शंका वाटली. पण त्याने इतरांना वाटणारी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. चेंडूच्या दिशेने उडी घेत चार धावा वाचवल्या. जर हा चेंडू अडवला नसता तर चौकार आला असता. बारबाडोस रॉयल्सने त्याच्या प्रयत्नांची स्तुती केली आहे. व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं की, ‘100% प्रयत्न. 200% वचनबद्धता. रहकीम कॉर्नवॉल.’
100% effort. 200% commitment. Rahkeem Cornwall. 🫡💗 pic.twitter.com/1ZQouwqHTh
— Barbados Royals (@BarbadosRoyals) September 12, 2024
रहकीम कॉर्नवॉल वेस्ट इंडिजसाठी कसोटी क्रिकेटमध्ये खेळतो. आतापर्यंत 10 कसोटी खेळला असून 17 डावात फलंदाजी करत 261 धावा केल्या आहेत. तर 18 डावात गोलंदाजी करत 35 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, अँटिगुआ आमि बारबुडा फाल्कन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावा दिल्या. बार्बाडोसने 14.3 षटकात 3 गडी गमवून 127 पर्यंत मजल मारली आणि पाऊस पडला. डकवर्थ लुईस नियमानुसार बार्बाडोसचा संघ 10 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे रहकिमला या सामन्यात खातंही खोलता आलं नाही.तसेच गोलंदाजीत रहकीमने 1 षटक टाकलं आणि 13 धावा दिल्या.