नवी दिल्ली | चरीथ असलंका याच्या झुंजार आणि चिवट शतकाच्या जोरावर श्रीलंका टीमने बांगलादेशसमोर विजयासाठी 280 धावांचं आव्हान ठेवलंय. श्रीलंकेने 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 279 धावा केल्या. श्रीलंका टीमकडून चरिथने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. तर इतरांनाही चांगलं योगदान दिलं. काही अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर फलंदाजांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या आकड्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आलं. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिब याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेकडून चरिथ असलंका याने 105 बॉलमध्ये सर्वाधिक 108 धावा केल्या. चरिथने या दरम्यान 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले. ओपनर पाथुम निसंका आणि समरविक्रमा या दोघांनी प्रत्येकी 41 धावांचं योगदान दिलं.धनंजया डी सिल्वा याने 34 रन्स केल्या. महीश तीक्षणा याने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर कॅप्टन कुसल मेंडीस याने 19 धावांचं योगदान दिलं. कुसल परेरा आणि चमीरा या दोघांनी 4-4 धावा केल्या. राजिथा झिरोवर आऊट झाला. दिलशान मदुशंका झिरोवर नाबाद परतला. तर अँजलो मॅथ्यूज दुर्देवी ठरला. मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद होणारा पहिला फलंदाज ठरला.
बांगलादेशकडून तंझिम साकिब या व्यतिरिक्त शोरिफूल इस्लाम, कॅप्टन शाकिब अल हसन आणि मेहदी हसन यांनी विकेट घेतल्या. शोरिफूल आणि शाकिब या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन मिराजच्या खात्यात 1 विकेट गेली.
चरिथ असलंका याचं शतक
Target set! Sri Lanka puts up 279 on the board. Now, it’s time to defend with all our might! #SLvBAN #CWC23 #LankanLions pic.twitter.com/g75u3f9j8c
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) November 6, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.