CSK vs SRH Live Score, IPL 2022 : हैदराबादच्या विजयाचा सूर्य उगवला, चेन्नईने लावला पराजयाचा चौकार

| Updated on: Apr 09, 2022 | 8:18 PM

chennai super kings vs Sunrisers Hyderabad live score in marathi : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादमध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय.

CSK vs SRH Live Score, IPL 2022 : हैदराबादच्या विजयाचा सूर्य उगवला, चेन्नईने लावला पराजयाचा चौकार
आज सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना
Image Credit source: tv9
Follow us on

आयपीएल 2022च्या (IPL 2022) सीजन 15 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोन संघामध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. या सीजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईने (CSK) हैदराबादच्या विरुद्ध सुरुवात तर चांगली केली. मात्र, त्यांना आणखी चांगले रन बनवता आले असते. पण, तसं चेन्नईच्या संघाला जमलं नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगले खेळत होते. पण त्यांना चांगले रन नाही काढता आले. त्यानंतर रायडू आणि मोईन अली यांनी संघासाठी चांगली खेळू करुन रन बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना फारस यश आल्याचं दिसलं नाही. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा हरल्याचं दिसून आलं. त्यापूर्वी शिवम दुबे याने तीन रन बनवले आणि तोही आऊट झाला. तर शेवटच्या ओवरमध्ये रवींद्र जडेजाच्या तुफान फलंदाजीने चेन्नईला दीडशेच्या जवळपास रन बनवता आले.

Key Events

चेन्नई सुपर किंग्सचा संघ तीन सामने खेळला असून तिन्हीही सामने पराजीत झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सला आज चांगली कामगिरी करुन गुणतालिकेत आगेकुच करावी लागणार आहे

सनराईजर्स हैदराबादचा संघ दोन सामने खेळला असून दोन्ही सामने हरला आहे.

चेन्नई प्रमाणेच हैदराबादला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 09 Apr 2022 06:08 PM (IST)

    मोईन अलीच्या बॉलवर विलियमसनचा षटकार

    मोईन अलीच्या बॉलवर विलियमसनचा षटकार लगावला आहे. हैदराबादचे 8 ओवर एक बॉलमध्ये 53 रन झाले आहेत.

  • 09 Apr 2022 06:02 PM (IST)

    हैदराबादच्या 7 ओवरमध्ये 42 धावा

    चेन्नईने हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. हैदराबादने 7 ओवरमध्ये 42 धावा काढल्या आहेत. यात अभिषेकने एक षटकार लगावलाय.


  • 09 Apr 2022 05:28 PM (IST)

    हैदराबादला 155 रनचं टार्गेट, जडेजाच्या तुफान फलंदाजीची सर्वत्र चर्चा

    हैदराबादला 155 रनचं टार्गेट दिलंय. चेन्नईने 20 ओवरमध्ये 154 रन काढले आहेत. तर आजच्या या सामन्यात जडेजाच्या तुफान फलंदाजीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  • 09 Apr 2022 05:18 PM (IST)

    चेन्नईला झटक्यांवर झटके, जडेजा आऊट

    चेन्नई सुपर किंग्सला झटक्यांवर झटके बसत असून चेन्नईची सातवी विकेट गेली आहे. जडेजा आऊट झालाय. चेन्नईने 19 ओवर चार बॉलमध्ये दीडशे रन काढले आहेत.

  • 09 Apr 2022 05:09 PM (IST)

    CSK संघाला पुन्हा झटका, धोनी आऊट

    CSK संघाला पुन्हा झटका बसला असून महेंद्र सिंग धोनी आऊट झालाय. सीएसकेचे 18 ओवर तीन बॉलमध्ये 127 रन झाले आहेत.

  • 09 Apr 2022 05:00 PM (IST)

    CSK संघाला पुन्हा झटका, शिवम दुबेची विकेट

    चेन्नई सुपर किंग्सची पाचवी विकेट गेली आहे. नटराजनने शिवम दुबेला आऊट केलं आहे. चेन्नईचे 17 ओवरमध्ये 117 रन झाले आहेत.

  • 09 Apr 2022 04:51 PM (IST)

    CSKची चौथी विकेट, रायडूनंतर मोईन आऊट

    चेन्नई सुपर किंग्सची चौथी विकेट गेली असून अंबाती रायडू नंतर मोईन आऊट झालाय. चेन्नई सुपर किंग्सने 15 ओवर 2 बॉलमध्ये 110 रन बनवले आहेत. तर आतापर्यंत उथप्पा, ऋतुराज, रायडू आणि मोईन अशा चार विकेट गेल्या आहेत.

  • 09 Apr 2022 04:43 PM (IST)

    CSKची तिसरी विकेट, रायडू आऊट

    चेन्नई सुपर किंग्सची तिसरी विकेट गेली, सुंदरे अंबाती रायडूला आऊट केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 14 ओवरमध्ये 1 00 रन बनवले आहेत. तर आतापर्यंत उथप्पा, ऋतुराज आणि रायडू अशा तीन विकेट गेल्या आहेत.

     

  • 09 Apr 2022 04:26 PM (IST)

    अंबाती रायडूचे सलग दोन चौकार

    अंबाती रायडूने सलग दोन चौकार मारले आहेत. 11 ओवरमध्ये चेन्नईने 78 रन झाले आहेत. तर आतापर्यंत दोन विकेट गेल्या आहेत.

  • 09 Apr 2022 04:09 PM (IST)

    7 ओवर पूर्ण, चेन्नचे 45 रनवर दोन विकेट

    चेन्नईने सात ओवरमध्ये 45 रन काढले असून आतापर्यंत दोन विकेट गेल्या आहेत.

  • 09 Apr 2022 04:06 PM (IST)

    अंबाती रायडूचा चौकार

    अंबाती रायडूने चौकार मारला आहे.  मोईन अलीने 10 बॉलमध्ये 1 चौकारसह  पाच रन काढले आहेत. त्यामुळे 6 ओवर 5 बॉलमध्ये चेन्नचे रन 45 रन झाले असून उथप्पा आणि ऋतुराज या दोन विकेट गेल्या आहेत.

     

  • 09 Apr 2022 03:58 PM (IST)

    टी नटराजनच्या बॉलवर ऋतुराज गायकवाड आऊट

    टी नटराजनच्या बॉलवर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. चेन्नईने 5 ओवर 4 बॉलमध्ये 39 रन काढले आहेत.

  • 09 Apr 2022 03:53 PM (IST)

    वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर ऋतुराजचा चौकार

    वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर ऋतुराज गायकवाडने चौकार मारला आहे. चेन्नईने 4 ओवर 4 बॉलमध्ये 34 रन काढले आहेत.

  • 09 Apr 2022 03:50 PM (IST)

    कोर्टात युक्तिवाद कुणी कुणी केला?

    संदीप गायकवाड- कर्मचाऱ्यांचे वकील
    प्रदीप घरत- सरकारी वकील
    महेश वासवानी- गुणरत्न सदावर्ते यांचे वकील
    न्यायामूर्ती सावंत यांच्या समोर युक्तिवाद
    गुणरत्न सदावर्तेंसह 110 कर्मचारी आरोपी

  • 09 Apr 2022 03:48 PM (IST)

    चेन्नईची पहिली विकेट, रॉबिन उथप्पा आऊट

    चेन्नईची पहिले विकेट गेली आहे. एडन मार्करामनं उथप्पाला झेलबाद आऊट केलंय. चेन्नईचे 3 ओवर 3 बॉलमध्ये 26 रन झाले आहेत.

  • 09 Apr 2022 03:41 PM (IST)

    मार्को जॅनसेनच्या बॉलवर ऋतुराज गायकवाडवाडचा चौकार

    मार्को जॅनसेनच्या बॉलवर ऋतुराज गायकवाडवाडचा चौकार मारला आहे. 2 ओवर 2 बॉलमध्ये 20 रन

  • 09 Apr 2022 03:33 PM (IST)

    भुवनैश्वर कुमारच्या बॉलवर रॉबिन उथप्पाचा चौकार

    भुवनैश्वर कुमारच्या बॉलवर रॉबिन उथप्पाने चौकार मारला आहे. पाच बॉलमध्ये आठ रन

  • 09 Apr 2022 03:13 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला, चेन्नईची पहिल्यांदा बॅटिंग

    सनरायझर्स हैदराबाद संघ : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन

  • 09 Apr 2022 03:11 PM (IST)

    चेन्नई सुपर किंग्सचं विजयाकडे लक्ष्य

    चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू : रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा (क), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी

  • 09 Apr 2022 03:06 PM (IST)

    सीएसके तिन्ही सामने हारला, आजच्या सामन्याकडे लक्ष्य

    चेन्नई सुपर किंग्सचा संघ तीन सामने खेळला असून तिन्हीही सामने पराजीत झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सला आज चांगली कामगिरी करुन गुणतालिकेत आगेकुच करावी लागणार आहे