मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये 46वा सामना सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला गेला. नाणेफेक हरल्यानंतर पहिले फलंदाजीचा निर्णय सीएसकेनं घेतला. त्यानंतर चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या, तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 203 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हैदराबादला ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. हैदराबादने 20 षटकात 6 बाद 189 धावा केल्या. त्यामुळे तेरा धावांनी चेन्नई सुपर किंग्सचा विजय झालाय. आजचा सामना जिंकल्याने चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये आहे त्याच स्थानी आहे. मात्र, त्यांच्या खात्तात आणखी एका विजयाची भर पडली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र नुकसान सहन करावं लागलंय.
That’s that from Match 46 of #TATAIPL.@ChennaiIPL win by 13 runs against #SRH.
हे सुद्धा वाचाScorecard – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/TuCa1F2mKs
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
Another double-wicket over from Mukesh Choudhary! ? ?#SRH 6 down as Shashank Singh and Washington Sundar depart.
Follow the match ? https://t.co/8IteJVPMqJ #TATAIPL #SRHvCSK pic.twitter.com/ydvEfOPAdG
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
सीएसकेच्या विकेट्स, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्सचा मॅच विनर खेळाडू चांगलाच रंगात होता. त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो. जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. पण, त्याने आज जे काही केलं. ते म्हणजे अफाट आणि सवोत्तम असं तुम्हीच म्हणाल. ऋतुराजने 12 चेंडूत तब्बल 60 धावा काढल्या. तर एकूण 57 चेंडूत त्याने तब्बल 99 धावा काढून आपला खरा रंग दाखवला. इतकंच नव्हे तर 6 चौकार आणि 6 षटकारही या मराठी मुलाने ठोकले. गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली आणि चांगलाच चर्चेत आला. आता चहुकडे फक्त ऋतुराजच ऋतुराज होतंय. म्हणून हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो म्हणावं लागेल.
ऋतुराज गायकवाडचे सह षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 203 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या.
डेव्हन कॉनवेच्या जोरदार धावा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आजचा सामना जिंकल्याने चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये आहे त्याच स्थानी आहे. मात्र, त्यांच्या खात्तात आणखी एका विजयाची भर पडली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र नुकसान सहन करावं लागलंय.