मुंबई : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या लीगमध्ये अनेक रेकॉर्ड होताना पाहिले आहेत. काही सामन्यांचा निकाल हा अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेला तरी लागत नाही. शुक्रवारी असाच एक सामना झाला, अवघ्या 2 धावांनी या सामन्यामध्ये सदर्न ब्रेव्ह संघाने विजय मिळवला. इंग्लंडचा ऑल राऊंडर खेळाडू ख्रिस जॉर्डन याच्या वादळी खेळीने संपूर्ण सामन्याचं चित्र बदललं. सदर्न ब्रेव्ह आणि वेल्श फायर यांच्यात झालेला सामना प्रेक्षकांसाठी पैसा वसुल ठरला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सदर्न ब्रेव्ह संघाचे व्हन कॉनवे 4 धावा, फिन ऍलनने 21 आणि कर्णधार जेम्स विन्सने 18 धावा केल्या. जॉर्ज गार्टेन 12 धावा आणि टीम डेव्हिड 2 धावा यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ख्रिस जॉर्डन याने संघ अडचणीत असताना फलंदाजीला येते चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. संंघाची धावसंख्या 56-6 अशी असताना 100 धावा तरी होतील की नाही अशी शंका होती. मात्र ख्रिस जॉर्डन याने अवघ्या 32 चेंडूत 70 धावा करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. य़ामध्ये त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले. अखेर सदर्न ब्रेव्ह संघाच्या 147 धावा झाल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेल्श फायर संघाचाही सुरूवात काही चांगली झाली नाही. 6 धावांवर त्यांचा पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर ल्यूक वेल्स 24 धावा आणि स्टीफन एस्किनाझी 31 धावा यांनी डाव सावरला होता. मात्र त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही. टॉम एबेल 11 धावा, डेव्हिड विली 31 धावा , ग्लेन फिलिप्स 22 धावा करून माघारी परतले. शेवटी संघाचा अवघ्या 2 धावांनी पराभव झाला.
वेल्श फायर (प्लेइंग इलेव्हन): ल्यूक वेल्स, जो क्लार्क (W), ग्लेन फिलिप्स, स्टीफन एस्किनाझी, टॉम एबेल (C), डेव्हिड विली, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, डेव्हिड पायने, बेन ग्रीन, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी
सदर्न ब्रेव्ह (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (W), जेम्स व्हिन्स (C), लेउस डु प्लॉय, टिम डेव्हिड, जेम्स फुलर, जॉर्ज गार्टन, ख्रिस जॉर्डन, रेहान अहमद, क्रेग ओव्हरटन, टायमल मिल्स