IND vs NZ : टीम इंडियावर उपांत्य फेरीचं प्रेशर! सामन्यापूर्वी कोच राहुल द्रविडनं खरं काय ते सांगून टाकलं

| Updated on: Nov 13, 2023 | 3:41 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. आता 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने मोठं विधान केलं आहे.

IND vs NZ : टीम इंडियावर उपांत्य फेरीचं प्रेशर! सामन्यापूर्वी कोच राहुल द्रविडनं खरं काय ते सांगून टाकलं
IND vs NZ : उपांत्य फेरीपूर्वी कोच राहुल द्रविडचं मोठं विधान, टीम इंडियाबाबत स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

मुंबई : वर्ल्डकप जेतेपदापासून भारतीय संघ दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वी 2019 च्या जखमा ओल्या झाल्या आहेत. कारण आजपासून चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारतीय संघांच्या स्वप्नावर पाणी फेरलं होतं. 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेतही टीम इंडिया टॉपवर होती. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा 2023 वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड याने मान्य केलं की बुधवारी वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना हायप्रेशर असेल. “जर मी सांगितलं की काहीच दबाव नाही, तर ते चुकीचं ठरेल. आपल्याकडे क्रिकेटमधील कोणताही सामना जिंकण्याची गॅरंटी नाही. आपण फक्त सर्वश्रेष्ठ तयारी करू शकतो आणि आम्ही तसं करत आहोत.”, असं राहुल द्रविड म्हणाला.

साखळी फेरीतील चांगल्या कामगिरीचं कसं विश्लेषण कराल असा प्रश्न राहुल द्रविडला विचारण्यात आला. त्यावर मजेशीर उत्तर देत राहुल द्रविड म्हणाला की, ‘जेव्हा सर्व व्यवस्थित चालतं तेव्हा चांगलं वाटतं. एक पराभव झाला की प्रत्येक जण सांगतं की आपल्याला काहीच येत नाही.’ यानंतर राहुल द्रविडने श्रेयस अय्यर कामगिरीचं कौतुक केलं.

‘श्रेयस अय्यर मधल्या फळीचा कणा आहे. सर्वांनाच माहिती आहे की मागच्या दहा वर्षात चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करणारा फलंदाज शोधणं किती कठीण आहे.’, असं राहुल द्रविड म्हणाला. ‘श्रेयस अय्यर असो की केएल राहुल..किंवा जडेजा..इतकंच काय तर सूर्यकुमार यादवही चांगली फलंदाजी करत आहे. यामुळे विश्वास आहे की आमच्याकडे अनुभव आहे.’, असंही द्रविड पुढे म्हणाला.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदाप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

न्यूझीलंड : केन विल्यमसन, मार्क चॅपमॅन, विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, डेवॉन कॉनव्हे, टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, ईश सोढी, कायल जेमिसन, लोकी फर्ग्युसन, टिम साऊथी, ट्रेंट बोल्ट.