भारतात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेने आपली आवडती ऑल टाइम आयपीएल प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. पण आयपीएलमधील यशस्वी कर्णधार रोहित शर्माला डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयपीएलमधील 17 पर्वांचं आकलन करून हर्षा भोगलेने हा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व हर्षा भोगले यांनी महेंद्रसिंह धोनीच्या हाती सोपवलं आहे. महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा जेतेपद मिळवलं आहे. अजूनही त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही. तसेच आयपीएलच्या 18 व्या पर्वात खेळणार असं दिसत आहे. दुसरीकडे, रोहित शर्माला संघातून डावललं असलं तरी संतुलित संघ आहे. हर्षा भोगले यांनी ओपनर म्हणून ख्रिस गेल आणि विराट कोहली यांची निवड केली आहे. ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी आरसीबीसाठी ओपनिंग केली आहे. दोघांनी 28 डावात 1210 धावा केल्या होत्या. दोघांनी 4 वेळा शतक आणि 4 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर आयपीएल म्हणून सुरेश रैना याला स्थान दिलं आहे. सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेत 5000 धावा केल्या आहेत. सुरेश रैना क्षेत्ररक्षणातही जबरदस्त आहे. त्याने 109 झेल घेतल्या आहेत. तर गोलंदाजीतही हात आजमावला आहे. चौथ्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याला निवडलं आहे. गेल्या काही वर्षात त्याने नावलौकिक मिळवला आहे. तसेच टी20 फॉर्मेटसाठी टीम इंडियाची धुरा त्याच्याच खांद्यावर आहे. धोनी पाचव्या स्थानावर असेल तर विकेटकीपरची भूमिका बजावणार आहे.
हर्षा भोगलने सहाव्या स्थानावर अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड केली आहे. हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाज आहे, तसेच फलंदाजीतही जबरदस्त आहे. तर सुनील नरीनला गोलंदाज आणि फलंदाजी म्हणून संघात स्थान दिलं आहे. तर गोलंदाज म्हणून लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह आणि राशीद खानला संधी दिली आहे.
हर्षा भोगले यांनी निवडलेली ऑल टाइम आयपीएल 11 : विराट कोहली, ख्रिस गेल, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, राशिद खान, सुनील नरीन.