नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारतीय महिला क्रिकेट संघाची सोमवारी (11 जुलै) घोषणा करण्यात आली. हरनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्जचं टी-20 संघात पुनरागमन झालं आहे. या स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे. शेवटच्या वेळी 1998 मध्ये क्रिकेटचा भाग होती. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला संघच सहभागी होणार आहेत. कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या एजबॅस्टनमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. यामुळे या संघात कोण असणार याविषयी उत्सुकता आहे. राष्ट्रकुल स्पर्धेची जगभरातील लोकांना उत्सुकता असते. या स्पर्धेकडे लोक लक्ष देऊन असतात. विशेष म्हणजे आता महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांना देखील राष्ट्रकुल संघात भारीतय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) कामगिरी पाहता येणार आहे.
? NEWS ?: #TeamIndia (Senior Women) squad for Birmingham 2022 Commonwealth Games announced. #B2022 | @birminghamcg22 pic.twitter.com/lprQenpFJv
हे सुद्धा वाचा— BCCI Women (@BCCIWomen) July 11, 2022
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया (wk), यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
स्टँडबाय खेळाडू : सिमरन दिल बहादूर, रिचा घोष, पूनम यादव.
भारत अ गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत आहे. ब गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया 29 जुलैला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
भारतीय महिला क्रिकेट संघ 215 सदस्य आहे. हे सर्व सदस्य बर्मिंगहॅमला जाणार आहेत. या संघात 108 पुरुष आणि 107 महिलांचा समावेश आहे. एकूण सदस्य 322 असतील. यामध्ये 72 संघ अधिकारी, 26 अतिरिक्त अधिकारी, नऊ प्रासंगिक कर्मचारी आणि तीन महाव्यवस्थापकांचा समावेश आहे.
यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 19 खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. क्रिकेट शेवटचे क्वालालंपूर गेम्समध्ये पाहिले होते. त्यानंतर 50 षटकांचे सामने खेळवले गेले. फक्त पुरुष संघांनी भाग घेतला. यावेळी 16 संघांनी सहभाग घेतला. अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, शॉन पोलॉक, जॅक कॅलिस या दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला.