SL vs IND: संजू सॅमसन-अभिषेक शर्माला डच्चू, शशी थरुर यांचा संताप, ट्विट करत म्हणाले..

| Updated on: Jul 19, 2024 | 12:25 AM

Shashi Tharoor On Bcci: बीसीसीआय निवड समितीने 18 जुलै रोजी भारतीय संघांची श्रीलंका दौऱ्यासाठी घोषणा केली. बीसीसीआयने काहींना संधी दिली तर प्रतिभावान खेळाडूंना डावळलंय.

SL vs IND: संजू सॅमसन-अभिषेक शर्माला डच्चू, शशी थरुर यांचा संताप, ट्विट करत म्हणाले..
Sanju Samson and Shashi Tharoor
Follow us on

टीम इंडिया जुलैअखेरीस श्रीलंका दौरा करणार आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टी 20i आणि वनडे सीरिजमधील प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा आणि टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याला कर्णधार केलं आहे. तर शुबमन गिल हा दोन्ही मालिकेत उपकर्णधार असणार आहे. निवड समितीने काही खेळाडूंना वगळलं आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि युवा अभिषेक शर्मा या दोघांना वगळलं आहे. त्यावरुन काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

अभिषेक शर्मा याने झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेतून पदार्पण केलं होतं. अभिषेकने त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यानंतरही अभिषेकला श्रीलंके विरूद्धच्या दोन्ही मालिकेतून वगळलं आहे. तर संजू सॅमसन याला वनडे सीरिजमध्ये स्थान देण्यात आलं नाही. संजूने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलं होतं. थरुर यांनी नेमका हाच धागा धरत संताप व्यक्त केला आहे.

शशी थरुर काय म्हणाले?

“या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची इंटरेस्टिंग निवड करण्यात आली. गेल्या वनडे सामन्यात शतक ठोकणाऱ्या संजू सॅमसनला वनडे सीरिजमधून बाहेर केलं गेलं. तर अभिषेक शर्मा, ज्याने झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिकेत शतक ठोकलं, त्याला कोणत्याही मालिकेसाठी घेतलं नाही”, असं थरुर यांनी नमूद केलंय.

थरुर यांनी निवड समितीने निवडीवर बोट ठेवलंय. तसेच टीम इंडियासाठीच्या उल्लेखनीय कामगिरीऐवजी आयपीएलमधील कामगिरीला प्राधान्य दिलं जात आहे, असा रोख थरुर यांचा आहे. “टीम इंडियासाठी निळ्या जर्सी घालून यशस्वी होणारे निवडकर्त्यांसाठी कमी महत्त्वाचे आहेत. तरीही टीम इंडियाला शुभेच्छा”, असंही थरुर म्हणालेत.

शशी थरुर यांची सोशल मीडिया पोस्ट

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.