मुंबई : कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी होताना दिसत नाही. भारतीय क्रिकेट संघातही (Indian Cricket Team) कोरोनानं शिरकाव केलाय. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांच्यानंतर रोहित शर्मालाही (Virat Kohali)कोरोनाची लागण झाल्याचं समोर झालंय. आता एकमेव कसोटीत त्याचे खेळणे संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. असं असूनही भारतीय खेळाडू सतर्क होत नाहीत. आता ऋषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा चाहत्यांमध्ये सेल्फी घेत आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये मास्कशिवाय फिरताना आणि चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसले होते आणि दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा संघाला आणखी कोरोनाच्या विळख्यात ओढतोय.
सराव सामन्यादरम्यान जेव्हा प्रेक्षकांनी पंतला ऑटोग्राफऐवजी सेल्फी घेण्यास सांगितलं तेव्हा ब्रॉडकास्टरनं सांगितले की भारतीय खेळाडू यापुढे प्रेक्षकांमध्ये जाणार नाहीत. यासोबतच कोणताही खेळाडू ऑटोग्राफही देणार नाही. पण पंतने असं काही केलं नाही. तो चाहत्यांमध्ये पोहोचला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी घेतला.
Ground announcer at the #IndiaTourMatch: “During the course of #LEIvIND, India’s players will not be signing autographs or taking selfies with any fans.”
Rishabh Pant: pic.twitter.com/tVtMcG29iQ
— Nakul Pande (@NakulMPande) June 25, 2022
ऋषभ पंतच्या चाहत्यांना त्याचं अशा सेल्फी घेणे खूप आवडलं आणि फोटो काढल्यानंतर सर्व चाहते खूप आनंदी दिसले. मात्र, पंतची ही बेफिकीर वृत्ती टीम इंडियाला अडचणीत आणू शकते. कर्णधार रोहितनंतर पंतसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यास टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. या कारणास्तव भारतीय खेळाडूंना फोटो काढणे आणि ऑटोग्राफ देणे टाळण्यास सांगितले होते. परंतु पंतनं या नियमाकडं दुर्लक्ष केलं आणि प्रेक्षकांमध्ये सेल्फी घेतलं.
ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाचा दावेदार आहे. जर कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे कसोटी सामना खेळू शकला नाही. फक्त ऋषभ पंतलाच कर्णधार बनवता येईल. त्यांना काही झाले तर भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो आणि विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह यांना कर्णधारपद स्वीकारावे लागू शकते.
1 जुलैपासून होणारा कसोटी सामना पहिल्या वर्षी 2021 मध्ये होणार होता. परंतु भारतीय संघात कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे आणि शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणू इच्छितो. पंतसारखे खेळाडू यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर इतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.