लंडन | टीम इंडिया आयपीएल 16 व्या मोसमानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामना खेळणार आहे. या महामुकाबल्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. एका बाजूला भारतीय आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा द वॉल 2 अर्थात चेतेश्वर पुजारा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. पुजारा याने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये सलग तिसरं शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे डबल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या गोटात दहशतीचं वातावरण दिसून येत आहे.
या काउंटी चॅम्पियनशीप मध्ये वर्सेस्टरशायर विरुद्ध ससेक्स या दोन्ही संघात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ससेक्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा हुकमाचा एक्का चेतेश्वर पुजारा याने शतक ठोकलंय. विशेष बाब म्हणजे पुजाराने केलेल्या या शतकाच्या जोरावर ससेक्स टीमला दुसऱ्या डावात 109 धावांची आघाडी घेता आली.
पुजाराने 189 बॉलमध्ये 19 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 136 धावांची खेळी केली. पुजाराचं हे सलग तिसरं शतक ठरलं. ससेक्सने पहिल्या डावात ऑलआऊट 373 धावा करत 109 धावांची आघाडी घेतली. त्याआधी ससेक्सच्या गोलंदाजांनी वर्सेस्टरशायरला 264 धावांवर ऑलआऊट केलं.
चेतेश्वर पुजारा याचं शतक
? [275-6] #GOSBTS pic.twitter.com/daxfyUVhhc
— Sussex Cricket (@SussexCCC) May 5, 2023
दरम्यान पुजाराच्या या खेळीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी धसका घेतलाय. पुजाराने सलग 3 शतकं ठोकल्याने ऑस्ट्रेलियाने नक्कीच पुजाराला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये रोखण्यासाठी नक्कीच रणनिती आखली असेल. हा डब्ल्यूटीसी फायनल सामना 7 ते 11 जूनदरम्यान द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पुजारालाच या काउंटी स्पर्धेच्या अनुभवाचा फायदा हा महामुकाबल्यात होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
वर्सेस्टरशायर प्लेइंग इलेव्हन | एड पोलॉक, जेक लिबी, अझहर अली, जॅक हेन्स, अॅडम होस, ब्रेट डोलिवेरा (कॅप्टन), गॅरेथ रॉडरिक (विकेटकीपर), मॅथ्यू वेट, जो लीच, जोश टंग आणि बेन गिब्बन
ससेक्स प्लेइंग इलेव्हन | चेतेश्वर पुजारा (कॅप्टन), टॉम क्लार्क, अॅलिस्टर ऑर, टॉम अलस्प, स्टीव्हन स्मिथ, जेम्स कोल्स, ऑलिव्हर कार्टर (विकेटकीपर), फिन हडसन-प्रेंटिस, ऑली रॉबिन्सन, शॉन हंट आणि हेन्री क्रोकोम्बे.