मुंबई : क्रिकेटमध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक अतरंगी कॅच पाहिले असतील. दिवसेंदिवस फिल्डिंगचा दर्जा सुधारताना दिसत आहे. सर्वच संघातील खेळाडू फिल्डिंगवर काम करतात. कारण एक कॅचसुद्धा संपूर्ण सामना पालटवू शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सर्वात अनफिट कीपरपैकी असलेल्या खेळाडूने जबरदस्त कॅच घेतला आहे.
WHAT. A. CATCH. AZAM. KHAN. 🔥🔥🔥
Unbelievable take 😱 #CPL23 pic.twitter.com/uw4uSX4un5
— Farid Khan (@_FaridKhan) September 6, 2023
पाकिस्तानचा माजी विकेटकीपर मोईन खान सर्वांनाच माहित आहे. पाकिस्तानच्या मोठ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचा मुलगा आझम खान हासुद्धा क्रिकेटपटू आहे. आझम खान हा अनफिट असल्याने त्याला पाकिस्तान संघाकडून काही जास्त संधी मिळाली नाही. पण याच आझम खानने डाय मारत एक कडक कॅच घेतला आहे.
आझम खान याचं वजन 140 किलोपेक्षा जास्त होतं. त्याने आता आपलं वजन कमी करण्यास सुरूवात केली आहे. तरीही त्याचंं वजन आताही 100 किलोपेक्षा जास्त आहे. आझम हा आत्ता 25 वर्षांचा असून तो सर्वच लीगमध्ये खेळताना दिसतो. आता कॅरेबियन लीग सुरू असून त्यामध्य तो गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळत आहे. त्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने कमाल झेल घेतला. 5 व्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन याचा कॅच आझमच्या दिशेने गेला. मात्र हा झेल काही सोपा नव्हता.
दरम्यान, आझम खान याने घेतलेला कॅच पाहून त्याचं समालोचकांनीही कौतुक केलं होतं. अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना त्याने 14 बॉलमध्ये 29 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आंद्रे रसेल याच्या बॉलिंगवर षटकार मारत त्याने संघाला विजय मिळवून दिला.