Bruce Murray Dies : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात पहिली वनडे मॅचचं गुवाहाटीत (Guwahati) आयोजन करण्यात आलयं. या सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी या दिग्ग्जाला श्रद्धांजली वाहिली आहे. (cricket news legendary new zealand cricketer bruce murray dies age 82)
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू ब्रूस मरे यांचं निधन झालंय. मरे यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूझीलंडने आपल्या ब्लॅककॅप्स या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. मरे यांच्या निधनाने क्रिकेट विश्व पोरकं झालंय. आपल्यातून एक दिग्गज क्रिकेटपटू हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
We’re deeply saddened to note the passing of former Test batter and educator Bruce Murray, aged 82. “Bags” (as he was known) played 13 Tests between 1968 and 71, averaging 23.92. He was the grandad of WHITE FERNS Amelia and Jess Kerr. Our thoughts are with his family and friends. pic.twitter.com/1udmfcH0KV
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 10, 2023
मरे हे ओपनर बॅट्समन होते. त्यांनी 1968 साली कसोटी पदार्पण केलं. त्यांची क्रिकेट कारकीर्द छोटी राहिली. त्यांनी 13 कसोटी सामन्यांमध्ये 23.92 च्या सरासरीने 598 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता.
मरे यांची 90 ही सर्वोच्च खेळी होती. ही खेळी त्यांनी पाकिस्तान विरुद्ध 1969 साली लाहोरमध्ये केली. न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
मरे एकूण 102 फर्स्ट क्लास सामने खेळले. या एकूण 102 सामन्यांमध्ये त्यांनी 35.55 च्या सरासरीने 6 हजार 257 धावा केल्या. यामध्ये 6 शतकांचा समावेश आहे.