क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेणाऱ्या ‘या’ खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

| Updated on: Mar 03, 2023 | 8:46 PM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.  टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला पात्र ठरवलेल्या कर्णधाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेणाऱ्या या खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती
Follow us on

मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.  टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आपल्या नेतृत्त्वाखाली UAE संघाला पात्र ठरवलेल्या कर्णधाराने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्ती घेतलेल्या कर्णधाराचं नाव अहमद रझा असं आहे. 2022 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये युएई संघ पात्र ठरला होता, त्यावेळी अहमद रझाकडे संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. वर्ल्ड कपनंतर त्याच्याकडून टी-20 संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं.

गेल्या वर्षामध्ये त्याने एकही आंतराराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. अहमद रझा आता एका वेगळ्या प्रवासाला सुरूवात करणार असून प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समजत आहे. 2014 मध्ये अहमद रझा याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीली सुरूवात केली होती. अहमदने आतापर्यंत 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये 409 धावा, 55 टी-20 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 64 विकेट्स, टी-20 मध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत.

मी अभिमानाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मला खूप प्रेम आणि आदर मिळवून देणाऱ्या खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे. क्रिकेटच्या महान खेळात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि नेतृत्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचं अहमद रझा म्हणाला.

 

मी बोर्ड, माझे सहकारी, प्रशिक्षक, निवडकर्ते आणि माझ्या दिवंगत वडिलांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला सक्षम केलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी पत्नी मेहरीन, जी गेल्या अनेक वर्षांपासून माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे, असं अहमद रझाने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.