मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरूवात झाली असून न्यूझीलंड संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवत विजयाच श्रीगेणशा केला आहे. आज दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलंँड या दोन संघांमध्ये पार पडणार आहे. पाकिस्तान संघाने मोठी गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. या सामन्याआधी एक मोठं गुपित समोर आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना नेदरलँड संघासोबत होणार असून या सामन्याआधीा ही गोष्ट समोर आल्याने पाकिस्तान संघाची मोठी गोची झाली आहे.
पाकिस्तान संघाला आधीच मोठा झटका बसला आहे तो म्हणजे त्यांचं ब्रह्मास्त्र असलेला नसीम शाह वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. नसीन शाह खेळत नसल्यामुळे संघाच ताकद कमी झाली असताना दुसरा स्ट्राईक बॉलर असलेला शाहिन आफ्रिदी याच्याबाबत एक मोठी गोष्ट मॅनेजमेंटने लपवली. शाहिन आफ्रीदीसुद्धा पूर्ण फिच नाही तरीसुद्धा त्याला खेळण्याचा निर्णय पाकिस्तान संघाने घेतला.
पाकिस्तानचा रिपोर्टर झैनाब अब्बास आणि मोहम्मद आमीर या दोघांच्या बोलण्यातून हो गोष्ट समोर आली. मोहम्मद आमीरसोबत बोलताना अब्बास याने शाहिन आफ्रिदी पूर्णपणे फिट नसल्याचं सांगितलं. शाहिनच्या बोटाला सूज आली असून त्याला बॉलिंग करताना अडचण येत आहे. शाहिनच्या बोटाची सूज अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे बॉलिंगमध्ये तो हवा तसा इम्पॅक्ट पाडता येणार नाही.
दरम्यान, आशिया कपमध्ये नसीम शाहने घातक स्पेल टाकत भारताला घाबरवलं होतं. मात्र दुखापतीमुळे मॅचनविनरला वर्ल्ड कप खेळता येणार नाही. नसीमच्या जागी हसन अली याला संधी मिळाली आहे मात्र सराव सामन्यामध्ये त्यालाही काही खास कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पाकिस्तान संघाला यासाठी नवीन प्लॅन रेडी ठेवावा लागणार आहे. त्यात आता शाहिनबाबत अशी अपडेट समोर आल्याने पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे.
पाकिस्तान संघ: इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक