टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र आता दोघांनीही भावनिक पोस्ट करत याबाबतची घोषणा केली. हार्दिक पंड्या आणि नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नताशा आणि हार्दिक पंड्याचा लग्नाला 4 वर्षे झाली असून दोघांनाही अगस्त्य नावाचा नावाचा मुलगा आहे. दोघेही वेगळे झाल्यावर आता मुलगा कोणाकडे राहणार असा प्रश्न पडला आहे. याबाबत हार्दिक पंड्या पोस्टमध्ये काय म्हणाला ते जाणून घ्या.
आम्ही गेली 4 वर्षे एकत्र राहत असून आता दोघेही एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. दोघांनीही हे नातं टिकण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न केले. परंतु पण आता दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटत आहे. आम्ही एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण आणि एकमेकांविषयी असलेला आदर, आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो होतो. त्यामुळे हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं, असं हार्दिक आणि नताशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये मुलाबाबतही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आमचा मुलगा अगस्त्य हा कामय दोघांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. त्याच्या आनंदासाठी आम्ही जे काही करू शकतो ते सहपालक म्हणून करू. आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. तुम्ही या कठीण काळात आम्हाला समजून घेताल अशी सर्वांना विनंती करतो, असंही दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हार्दिक पंड्या आणि नताशाने लॉकडाऊनवेळी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर 30 जुलै 2020 ला दोघेही आई-बाबा झाले होते. त्यांनी आपल्या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवलं होतं, पंड्या आणि नताशाने ख्रिश्चन रितीरिवाजानुसार परत एकदा फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न केलं होतं.