Cricket : क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर! ‘या’ स्टार क्रिकेटपटूच्या 2 वर्षांच्या मुलीचं निधन!

| Updated on: Mar 19, 2023 | 8:36 PM

क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार क्रिकेटपटूच्या 2 वर्षाच्या मुलीचं निधन झालं आहे. निरागस मुलगी एपिलेप्सी या आजाराने त्रस्त होती. क्रिकेटपटूने याबाबत इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर करत निधनाची माहिती दिली.

Cricket : क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर! या स्टार क्रिकेटपटूच्या 2 वर्षांच्या मुलीचं निधन!
Follow us on

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार क्रिकेटपटूच्या 2 वर्षाच्या मुलीचं निधन झालं आहे. निरागस मुलगी एपिलेप्सी या आजाराने त्रस्त होती. फ्लॉरेंस असं तिचे नाव होतं. क्रिकेटपटूने याबाबत इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर करत फ्लॉरेंसच्या निधनाची बातमी दिली. मॅट डन असं इंग्लिश क्रिकेटपटूचं नाव आहे. या मुलीच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

मॅट डन 30 वर्षीय असून त्याने अंडर-19 आणि इंग्लंड लायन्सकडून तो खेळला आहे. वेगवान गोलंदाज मॅट डनने 2010 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 43 सामन्यांत 36.21 च्या सरासरीने 117 बळी घेतले आहेत. मॅट डनने गेल्या 11 वर्षांत 18 लिस्ट-ए आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये सरेकडून खेळले आहेत.

मुलीच्या निधनानंतर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट-

 

आमची मुलगी आजाराच्या विरोधात लढताना पराभूत झाली आहे. तिला SUDEP या आजाराने हरवलं आहे. या दु:खाच्या वेळी शब्द शोधणं कठीण आहे. तू आमच्यावर खूप प्रेम करत होतीस, तु आम्हाला सोडून गेलीस मात्र सर्वांवर जी काही छाप सोडली आहेस ती पाहण्यासारखी आहे. ज्या- ज्या खोलीमध्ये गेलीस ती प्रकाशमय केलीस. कायम तुझा अभिमान असेल.

 

दरम्यान, क्रिकेटबद्दल सांगायचं झाल्यास आज झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. तिसरा सामना करो वा मरो असा असणार आहे. तिसरा सामना जो कोण जिंकेल तो संघ मालिका खिशात घालणार आहे.