क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकरच्या जन्म तारखेतील घोळ उघड; क्रीडा आणि युवक कल्याण विभागाला अहवाल सादर

| Updated on: Feb 19, 2022 | 2:02 AM

उदयनमुख अष्टपैलू क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर (Cricketer Rajvardhan Hungargekar) याच्या वयाच्या दाखल्याबाबतचा घोळ समोर आला असून, त्याच्या जन्म दाखल्यात (Birth certificate) खाडाखोड केली असल्याचा अहवाल उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (Rahul Gupta) यांनी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना पाठवला आहे. या अहवालानंतर राजवर्धन याचे क्रीडा क्षेत्रातील करिअर धोक्यात आले आहे.

क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकरच्या जन्म तारखेतील घोळ उघड; क्रीडा आणि युवक कल्याण विभागाला अहवाल सादर
राजवर्धन हंगरगेकर
Follow us on

उस्मानाबाद : उदयनमुख अष्टपैलू क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर (Cricketer Rajvardhan Hungargekar) याच्या वयाच्या दाखल्याबाबतचा घोळ समोर आला असून, त्याच्या जन्म दाखल्यात (Birth certificate) खाडाखोड केली असल्याचा अहवाल उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (Rahul Gupta) यांनी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना पाठवला आहे. या अहवालानंतर राजवर्धन याचे क्रीडा क्षेत्रातील करिअर धोक्यात आले आहे. बीसीसीआयने केलेल्या तक्रारीनंतर क्रीडा आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडे जन्म दाखलाबाबत लेखी अहवाल मागवला होता, त्यानुसार गुप्ता यांनी अहवाल सादर केला आहे. राजवर्धन याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 असताना त्यात खाडाखोड करून 10 नोव्हेंबर 2002 अशी जन्मतारीख केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले आहे. दरम्यान आता हंगरगेकर याच्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

19 वर्षाखालील विश्वचषकातील कामगिरीमुळे चर्चेत

19 वर्षाखालील विश्वचषकातील कामगिरीमुळे चर्चेत आलेला आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या टीमने दीड कोटींची बोली लावल्यानंतर राजवर्धन हंगरगेकर देशभर चर्चेत आला होता, मात्र आता त्याच्या जन्मतारखेवरून त्याचे करिअर धोक्यात सापडले आहे. कमी वय दाखवून राजवर्धन हंगरगेकरने बीसीसीआयची फसवणूक केल्याचा आरोप असून राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे तशी तक्रार केली आहे.राजवर्धन याच्या जन्म तारखेत खाडाखोड केली असल्याचे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राजवर्धनला बीसीसीआयने केलेल्या नियमांच्या शिक्षेला समोरे जावे लागण्याची शक्यात आहे. बीसीसीआयने २०२० मध्ये काढलेल्या आदेशानुसार एखाद्या खेळाडूने बनावट कागदपत्र सादर करून वयात फेरफार केल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते, असे झाल्यास राजवर्धन याची आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही हिरावली जाऊ शकते.

मुळचा तुळजापूरचा रहिवासी

मूळचा तुळजापूर येथील व उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला वेगवान गोलंदाज व अष्टपैलू फलंदाज राजवर्धन हंगरगेकर हा अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खेळला असल्याने उस्मानाबादचे नाव देशात गाजले आहे. मात्र आता तो नव्या वादात अडकला आहे राजवर्धनच्या मुळ जन्मतारखेनुसार 19 वर्षाखालील विश्वचषकात खेळताना त्याचे वय 21 वर्ष इतके होते. राजवर्धनने मूळ वय लपवून बीसीसीआयची फसवणूक केल्याचा आरोप आहे.क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात राजवर्धन हंगरगेकरने शाळेच्या जन्म दाखल्यात फेरफार करून जन्म तारीख बदलली असल्याचे म्हटले आहे. शाळेतील नोंदीनुसार पहिली ते सातवीपर्यंत राजवर्धनची जन्म तारीख 10 जानेवारी 2001 आहे. मात्र आठवीमध्ये प्रवेश घेताना ही तारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 अशी केलेली आहे.

चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती

राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची चौकशी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पाच सदस्यी समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालानुसार राजवर्धन सुहास हंगरगेकर याची उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूल शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना जन्मतारीख 10 जानेवारी 2001 अशी नोंदवलेली आहे. इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळेतील नोंदीनुसार त्याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 अशीच आहे. दरम्यान तेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद या शाळेत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवायच जनरल रजिस्टरमध्ये खाडाखोड करून जन्मतारीख 10 नोव्हेंबर 2002 अशी केली. जन्मतारखेत बदल केल्यानंतर विद्यार्थ्याला 26 जून 2017 मध्ये 10 उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला. समितीने केलेल्या पडताळणीनुसार हंगरगेकर याची जन्मतारीख 10 नोव्हेंबर 2002 नसून 10 जानेवारी 2001 अशीच असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी क्रीडा आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर तो बीसीसीआयकडे पाठविला जाणार असून, त्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे.

संबंधित बातम्या

IND vs WI: निकोलस पूरन-पॉवेलची फटकेबाजी व्यर्थ, रोमांचक सामना भारताने आठ धावांनी जिंकला

IND vs WI: रोहित शर्माचा एका हाताने मारलेला षटकार पाहून गावस्कर म्हणाले….पहा VIDEO

IND vs WI: विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कुट-कुट कुटलं, बॅटने टीकाकारांची तोंड केली बंद