मुंबई : क्रिकेटविश्वात विराट कोहलीला रनमशिन्स म्हणून संबोधलं जातं. 36 वर्षीय विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा या ना त्या कारणाने होत असते. विराट कोहली हे नाव कायम लाईमलाईटमध्ये राहणारं आहे. पण विराट कोहली आता वेगळ्याचा कारणाने चर्चेत आला आहे. एकीकडे विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे क्रिकेटपासून दूर असताना भलतंच काही तरी समोर आलं आहे. एका व्हिडीओमुळे विराट कोहली चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर 20 फेब्रुवारीला एका न्यूज चॅनेलसह एक क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट कोहलीचा इंटरव्ह्यू मॉर्फ करण्यात आला आहे. तसेच लिपसिंक करून विराटसारखा आवाज टाकून फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यानंतर विराट कोहली डीपफेकचा शिकार ठरला आहे. सचिन तेंडुलकरने मागच्या महिन्यातच याची तक्रार करत सोशल मीडियावर राग व्यक्त केला होता. आता विराट कोहली डीपफेक प्रकरणाचा जाळ्यात अडकल्याने काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष लागून आहे.
सोशल मीडियावर हा डीपफेक व्हिडीओ असल्याचं अनेकांनी समोर आणलं आहे. आर्टिफिशिएल इंटिजिलेन्सचा चुकीचा वापर केला जात असल्याचं ही अनेकांचं म्हणणं आहे. विराट कोहलीच्या इमेजचा वापर ऑनलाइन ट्रेडिंग अॅपसाठी चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. या माध्यमातून विराट कोहली या अॅपचा प्रचार करत असल्याचं भासवलं जात आहे. पण हा व्हिडीओ फेक असून त्यावर विश्वास ठेवू नका असं देखील सांगण्यात येत आहे.
क्या ये सच में @anjanaomkashyap मैम और विराट कोहली हैं? या फिर यह AI का कमाल है?
अगर यह AI कमाल है तो बेहद खतरनाक है। इतना मिसयूज? अगर रियल है तो कोई बात ही नहीं। किसी को जानकारी हो तो बताएँ।@imVkohli pic.twitter.com/Q5RnDE3UPr
— Shubham Shukla (@ShubhamShuklaMP) February 18, 2024
डीपफेक प्रकरणात सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन देखील फसले आहेत. या प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. तसेच असं कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली खेळत नाही. कौटुंबिक कारणामुळे विराट कोहली क्रिकेटपासून दूर आहे. वैयक्तिक कारणाचा आदर करण्याचा सल्ला देखील बीसीसीआयने दिला होता. या दरम्यान असा व्हिडीओ समोर आल्याने चाहत्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.