तामिळनाडू |आयपीएल 16 व्या मोसमातील 17 वा सामना हा बुधवारी 13 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईला आपल्या होम ग्राउंडमध्ये पराभव स्विकारावा लागला.राजस्थानचा अखेरच्या चेंडूवर विजय झाला. मॅच विनिंग शॉटसाठी फेमस असलेला सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याला शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज असताना सिक्स मारण्यात अपयश आलं. त्यामुळे राजस्थानचा 3 धावांनी विजय झाला. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 172 धावाच करता आल्या. चेन्नईला पराभवानंतर मोठा झटका लागला. चेन्नईसाठी वाईट बातमी समोर आली.
चेन्नईच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. इतकंच नाही, तर दुखापतीमुळे या खेळाडूला बाहेर पडावं लागलं आहे. आता या खेळाडूला दुखापतीमुळे 2 आठवडे म्हणजे 14 दिवस खेळता येणार नाहीये. यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.
आता तो खेळाडू कोण आहे, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. चेन्नई फ्रँचायजीने या खेळाडूला बदली म्हणून 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. या खेळाडूचा कायले जेमीन्सन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. दुखापत झालेल्या खेळाडूचं नाव हे सिसंडा मागला असं आहे.
सिसंडा हा बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी करतो. शरीराने धिप्पाड उंचपुरा असेलला सिसंडा आपल्या बॉलिंगने फलंदाजांना चकवाही देतो आणि बॅटिंग करताना चौफेर फटकेबाजीही करतो.
सिसंडा याला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 2 ओव्हरच बॉलिंग करता आली. सिसंडा याने 2 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या. सिसंडा याला यानंतर फिल्डिंगदरम्यान कॅच घेताना अंगठीला दुखापत झाली होती. सामन्यानंतर हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने सिसंडा याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. सिसंडा याच्यावर उपचार सुरु आहेत. सिसंडा याला दुखापतीतून पूर्णपणे बरं व्हायला 2 आठवड्यांचा वेळ लागले, असंही फ्लेमिंग याने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडळ.