मुंबई : आयपीएल 2023 मधील फायनल सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा 5 विकेट्सने पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं होतं. सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने ट्रॉफी जिंकल्यानंतर ती तिरुपती बालाजी मंदिरात देवाच्या चरणी ठेवली. ट्रॉफीची पारंपारिक तमिळ विधींनी पूजा करण्यात आली. मंदिरात ट्रॉफी आणतानाचा आणि पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या पूजेदरम्यान सीएसके संघाचा कोणताही खेळाडू दिसला नाही.
पाहा व्हिडीओ-
IPL Trophy CSK Tirupati Temple : सीएसकेने फायनल जिंकल्यावर ट्रॉफीची तिरूपती बालाजी मंदिरात खास पूजा, पाहा व्हिडीओ #IPLTrophyCSKTirupatiTemple #CSK #Tirupai #IPLFinal2023 #म pic.twitter.com/ydzxU5fFMR
— Harish Malusare (@harish_malusare) May 31, 2023
तिरुपती बालाजी मंदिरात पूजेदरम्यान आयपीएल ट्रॉफीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विशेष पूजा करण्यात आली. तसे, आयपीएल जिंकल्यानंतर ट्रॉफी मंदिरात आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्रॉफी जिंकल्यानंतर मंदिरात पूजेसाठी आणण्यात आली होती. फ्रँचायझीचे मालक एन. संघाच्या यशाबद्दल श्रीनिवासन यांनी मंदिरात पोहोचून तिरुपती बालाजी देवाचा आशिर्वाद घेतला.
सीएसकेने आतापर्यंत पाचवेळा विजेतेपदार नाव कोरलं आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालीच मिळवली आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्सने सर्वाधिक पाचवेळा ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता सीएसकेनेही हा कामगिरी करत शिरपेचात आणथी एक मानाचा तुरा रोवला आहे.
आयपीएलच्या इतिहासात जितक्या फायनल झाल्या त्यामधील सर्वात जास्त थरारक फायनल ही यंदाच्या पर्वात झाली. कारण हा अंतिम सामना तीन दिवस चालला. वारा,पाऊस आणि त्यानंतर मैदानात झालेला चिखल अनेक संकटे आलीत मात्र शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यामध्ये सीएसकेने विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताने चेन्नईला 215 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना 15 ओव्हर्सचा करण्यात आला आणि 171 धावांचं आव्हान सीएसकेला देण्यात आलं. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघाला विजय मिळवू दिला.