मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं 168 धावांचं आव्हान दिल्लीला पेललं नाही. दिल्लीला 140 धावांवर रोखत 27 धावांनी विजय मिळवला सुरुवातीपासून चेन्नईचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर हावी झाले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच डेविड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर फलंदाजांना कमबॅक करण्यास गोलंदाजांनी संधीच दिली नाही. एखाद दोन षटकार मारले पण निर्धाव चेंडूमुळे विजयी धावांचं अंतर वाढतच गेलं. यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चेन्नईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 168 धावांचं आव्हान गाठताना खराब सुरुवात झाली. दीपक चाहरच्या दुसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नर बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फिल सॉल्ट 17 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला. मिशेल मार्श धावचीत झाला आणि धावांचं अंतर वाढतच गेलं. मनिष पांडे आणि रिली रोसोनं अर्धशतकी भागीदारी केली. पण इतक्या धीम्या गतीने केली त्याला काहीच अर्थ उरला नाही. मनिष पांडे 29 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिली रोस्सोही 35 धावा करून तंबूत परतला.
अक्षर पटेलने फटकेबाजी करत धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 21 धावा करून बाद झाला. रिपल पटेलही धावचीत होत तंबूत परतला, तिथपर्यंत संपूर्ण सामन्यावर चेन्नईची पकड निर्माण झाली होती. अखेर हा सामना चेन्नईने 27 धावांनी जिंकला.
Match 55. WICKET! 17.5: Axar Patel 21(12) ct Ajinkya Rahane b Matheesha Pathirana, Delhi Capitals 116/6 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 14.3: Rilee Rossouw 35(37) ct Matheesha Pathirana b Ravindra Jadeja, Delhi Capitals 89/5 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 12.6: Manish Pandey 27(29) lbw Matheesha Pathirana, Delhi Capitals 84/4 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 3.1: Mitchell Marsh 5(4) Run Out Ajinkya Rahane, Delhi Capitals 25/3 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 2.3: Phil Salt 17(11) ct Ambati Rayudu b Deepak Chahar, Delhi Capitals 20/2 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 0.2: David Warner 0(2) ct Ajinkya Rahane b Deepak Chahar, Delhi Capitals 0/1 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईची पॉवर प्लेमध्ये धीमी सुरुवात झाली. पाचव्या षटकात संघाच्या 42 धावा असताना डेवॉन कॉनव्हे बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड 24 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला मोईन अली काही खास करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करत तंबूत परतला. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणेला 21 धावांवर ललित यादवने तंबूचा रस्ता दाखवला.
शिवम दुबेने काही मोठे फटके मारत संघाच्या धावांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. पण मिशेल मार्शने त्याला तंबूत पाठवलं. अंबाती रायडू (23, रवींद्र जडेजा (21, महेंद्रसिंह धोनी (20 धावा करून तंबूत परतले.
दिल्लीकडून मिशेल मार्शने 3, अक्षर पटेलने 2, कुलदीप यादवने 1, खलील अहमदने 1 आणि ललित यादवने एक गडी बाद केला.
Match 55. WICKET! 19.5: MS Dhoni 20(9) ct David Warner b Mitchell Marsh, Chennai Super Kings 166/8 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 19.2: Ravindra Jadeja 21(16) ct Axar Patel b Mitchell Marsh, Chennai Super Kings 164/7 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 16.2: Ambati Rayudu 23(17) ct Ripal Patel b Khaleel Ahmed, Chennai Super Kings 126/6 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 14.2: Shivam Dube 25(12) ct David Warner b Mitchell Marsh, Chennai Super Kings 113/5 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
ललित यादवने त्याच्यात गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेचा झेल घेतला. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 21 धावा करून तंबूत परतला आहे.
Match 55. WICKET! 11.1: Ajinkya Rahane 21(20) ct & b Lalit Yadav, Chennai Super Kings 77/4 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
मोईन अली 7 धावा करून तंबूत परतला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मिशेल मार्शने त्याचा झेल घेतला.
Match 55. WICKET! 9.4: Moeen Ali 8(12) ct Mitchell Marsh b Kuldeep Yadav, Chennai Super Kings 64/3 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
Match 55. WICKET! 6.1: Ruturaj Gaikwad 24(18) ct Aman Khan b Axar Patel, Chennai Super Kings 49/2 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
डेवॉन कॉनव्हे 10 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.
Match 55. WICKET! 4.1: Devon Conway 10(13) lbw Axar Patel, Chennai Super Kings 32/1 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा
नाणेफेकीचा कौल जिंकत चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी निवडली आहे. संघात एक बदल केला असल्याचं महेंद्र सिंह धोनीने सांगितलं. “आम्ही प्रथम फलंदाजी करू. या विकेटवर आम्ही काही खेळ खेळले आहेत. ही विकेट मंद होण्याची शक्यता आहे.”, असं धोनीने सांगितलं.
Match 55. Chennai Super Kings won the toss and elected to bat. https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.