मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्याती सुरू असलेल्या सामन्याता पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्या दिवशी 28 मे ला पावसामुळे सामना 29 मे म्हणजेच आज खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आताही जोरदार पाऊस आला असून सामना थांबवला आहे. यामध्ये गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 215 धावांचं आव्हान सीएसकेला दिलं आहे. चेन्नईचा संघ बॅटींगला उतरल्यावर पहिलीच ओव्हर सुरू असताना पाऊस आला. पावासाचा जोर जास्त असल्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे.
पावसामुळे खेळ थांबलाय. आता सामना पुन्हा सुरु होण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्याबरोबरीने ओव्हर कमी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सीएसकेला याचा फटका बसू शकतो.
पाऊस आल्यावर दोन तासाची वाट पाहावी लागते. मात्र गुजरात संघाची बॅटींग झाली असल्याने जास्त वेळही वाट पाहिली जाईल. दोन तासांमध्ये एकही ओव्हर कमी केली जात नाही. दुसरीकडे डकवर्थच्य नियमानुसार गुजरातच्या कमी विकेट्स पडल्या आहेत, त्यामुळे हे सर्व गणित विकेट्स आणि धावांवर अवलंबून असतं. याच्या आधारावरच ओव्हर कमी केल्या जावू शकतात.
पाऊस आला तरी चाहत्यांचा जोश, उत्साह काही कमी झाला नाही. पाऊस पडत असतानाही चाहते माघारी न जाता त्यांनी पावसाचा आनंद लुटला. रविवारी पाऊस झाल्यावर सामना दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आला, आजही चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
CSK vs GT Live Updates : दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा