तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 14 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. केकेआरने या सामन्यात चेन्नईवर 6 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताने 145 धावांचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. सीएसके विरुद्ध केकेआर या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. या हंगामात दोन्ही संघ याआधी 23 एप्रिल रोजी आमनेसामने आले होते. चेन्नईने त्या सामन्यात केकेआरवर 49 धावांनी विजय मिळवला होता. तर आताकेकेआरने चेन्नईवर विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला. या विजयामुळे केकेआर प्लेऑफच्या आशा कायम आहेत. तर चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पुढील सामने जिंकावे लागणार आहेत.
केकेआरने सीएसकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने 145 धावांचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. नितीश राणा आणि रिंकू सिंह ही जोडी केकेआरच्या विजयाची शिल्पकार ठरली. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
रिंकू सिंह याने केकेआरसाठी निर्णायक क्षणी नितीश राणा याची साथ देत अर्धशतक पूर्ण केलं आहे. रिंकूने चौकार ठोकत अर्धशतक केलं. रिंकूने 39 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रिंकूने या दरम्यान 3 सिक्स आणि 4 फोर ठोकले.
रिंकू सिंह आणि कॅप्टन नितीश राणा या जोडीने केकेआरचा डाव सावरला आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 बॉलमध्ये 93 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रिंकूने अर्धशतकही पूर्ण केलं. त्यामुळे आता केकेआरला 24 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे.
दीपक चाहर याने जेसन रॉय याला आऊट करत केकेआरला तिसरा झटका दिला आहे. रॉय 12 धावांवर आऊट झालाय. त्यामुळे या स्कोअरिंग सामन्यात चेन्नईने कमबॅक केलं आहे.
केकेआरने दुसरी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यर 4 बॉलमध्ये 9 धावा करुन आऊट झाला आहे.
चेन्नईने केकेआरला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. दीपक चाहर याने रहमनुल्लाह गुरुबाज याला तुषार देशपांडे याच्या हाती कॅच आऊट केलं. देशपांडेने कडक कॅच घेतला.
केकेआरच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जेसन रॉय आणि रहमनुल्लाह गुरुबाज सलामी जोडी मैदानात बॅटिंगसाठी आली आहे. केकेआरसमोर विजयासाठी 145 धावांचं आव्हान आहे.
चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे याने केलेल्या 48 धावांच्या खेळीमुळे केकेआरला 145 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं. दुबेने 34 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने या 48 धावा केल्या. दुबेशिवाय डेव्हॉन कॉनवे याने 30, रविंद्र जडेजा याने 20, ऋतुराज गायकवाड याने 17, अजिंक्य रहाणे याने 16 धावांचं योगदान दिलं. तर अंबाती रायुडू आणि मोईन अली या दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या.
केकेआरकडून सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्थी या फिरकी जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोर या दोघांनीही 1-1 विकेट घेतली.
चेन्नईने सहावी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजा 20 धावा करुन आऊट झाला आहे.
शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. यासह चेन्नईच्या डावाला स्थिरता मिळाली आहे. या जोडीकडून आता अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजीची अपेक्षा आशा आहे.
सुनील नारायण याने चेन्नईला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. सुनीलने आधी अंबाती रायुडू याला बोल्ड केला. त्यानंतर मोईन अली यालाही बोल्ड केला.
चेन्नई सुपर किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. डेव्हॉन कॉनवे 28 बॉलमध्ये 30 धावा करुन आऊट झाला.
चेन्नई सुपर किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणे मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. रहाणेने 11 बॉलमध्ये 16 धावा केल्या. रहाणेची या सिजनमध्ये स्पिन विरुद्ध आऊट होण्याची आठवी वेळ ठरली.
चेन्नईला पहिला आणि मोठा धक्का लागला आहे. ऋतुराज गायकवाड 13 बॉलमध्ये 17 धावा करुन आऊट झाला आहे. ऋतुराज या मोसमात स्पिन विरुद्ध एकूण सात वेळा आऊट झाला आहे.
चेन्नईचा स्कोअर | 31-1, 3.3 ओव्हर.
सीएसकेने केकेआर विरुद्ध सामना जिंकल्यास प्लेऑफचं टेन्शन दूर होईल. मात्र हा सामना गमावला, तर पुढच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. तर केकेआरसाठी हा करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे या मॅचमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
चेन्नई सुपर किंग्सने केकेआर विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा हा या मोसमातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना आहे. धोनी या मोसमानंतर निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या धोनीला या मोसमात अखेरीस पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.
आयपीएल 16 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. युवा नितीश राणा याच्यासमोर कॅप्टन म्हणून चेन्नईसारख्या तगड्या आणि अनुभवी संघाचं आव्हान आहे.