तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 6 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला . चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला. या सामन्याचं आयोजन हे एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. चेन्नईने पहिले बॅटिंग करत लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. लखनऊचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला.
चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र लखनऊला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.
लखनऊने 218 धावांचं पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईने जोरदार कमबॅक करत लखनऊला बॅकफुटवर ढकललं आहे. लखनऊने आतापर्यंत 14 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 136 धावा केल्या आहेत. लखनऊला विजयासाठी 36 बॉलमध्ये 82 धावांची गरज आहे.
लखनऊने 218 धावांचं पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली आहे. कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 4 ओव्हर्समध्ये बिनबाद 56 धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे याने 47 रन्संचं योगदान दिलं. ऋतुराज आणि डेव्हॉन या दोघांनी केलेल्या 110 धावांच्या सलामी भागीदारीमुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. तर लखनऊकडून रवी बिश्नोई आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.
‘चेन्नई एक्सप्रेस सुस्साट’
Innings Break!@ChennaiIPL post a commanding total of 217/7 on board!
Can @LucknowIPL chase this down to bag their second win of the season❓
Stay tuned for the second innings!
Scorecard ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/sM1foAuWW4
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
चेन्नईकडून ऋतुराज या डेव्हॉन या व्यतिरिक्त शिवम दुबे आणि अंबाती रायुडू या दोघांनी प्रत्येकी 27 धावांचं योगदान दिलं. मोईन अली 19 रन्सवर आऊट झाला. धोनीने 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारुन 12 धावा केल्या. धोनीने यासह विक्रम केला. तर बेन स्टोक्स याने 8, रविंद्र जडेजा याने 3 आणि मिचेल सँटनरने 1* धाव केली.
चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमवून 217 धावा केल्या. लखनऊसमोर विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊला प्रत्येक षटकात 10.9 च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने शानदार सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले आहेत. डेव्हॉन कानवे आणि ऋतुराज गायकवाड सलामी जोडीने 110 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर चेन्नईने झटपट ठराविक अंतराने 4 विकेट्स गमावल्या. चेन्नईचे ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि मोईन अली हे 4 फलंदाज आऊट झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 60 धावा केल्या आहेत.
चेन्नई – 60-0, 5 ओव्हर्स
ऋतुराज गायकावड -40*
डेव्हॉन कॉनवे – 14*
चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात आली आहे. लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.
महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकला आहे. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल याने नाणेफेक जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.