M S Dhoni IPL 2023 | ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याचा महारेकॉर्ड

| Updated on: Apr 03, 2023 | 10:43 PM

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सहावा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

M S Dhoni IPL 2023 | कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याचा महारेकॉर्ड
Follow us on

तामिळनाडू | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठा कारनामा केला आहे. धोनीने बॅटिंग करताना सलग 2 बॉलमध्ये 2 सिक्स ठोकत 12 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी आऊट झाला. मात्र 12 धावा करुनही धोनीच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. धोनीने या कामगिरीसह कीर्तीमान केला आहे. धोनीने आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. धोनी यासह आयपीएलच्या इतिहासात 5 हजार रन्स पूर्ण करणारा एकूण 7 वा तर 5 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

महेंद्रसिंह धोनीला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याआधी 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 8 धावांची गरज होती. धोनीच्या नावावर 4 हजार 992 धावांची नोंद होती. मात्र धोनीने बॅटिंगसाठी मैदानात येताच सलग 2 सिक्स ठोकले आणि 5 हजार धावा पूर्ण केल्या. धोनीने सलग 2 फटके मारल्याने चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियममध्ये धोनी धोनी असा जयघोष पाहायला मिळाला. धोनीच्या या फटक्यांनी उपस्थित क्रिकेट चाहत्यांचा पैसा वसूल केला.

हे सुद्धा वाचा

धोनीच्या  5 हजार धावा

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा आरसीबीचा ‘किंग कोहली’ रनमशीन नावाने ओळखला जाणारा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट कोहली याने आतापर्यंत 6 हजार 706 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – 6 हजार 706 धावा
शिखर धवन – 6 हजार 284 धावा
डेव्हिड वॉर्नर – 5 हजार 937 धावा
रोहित शर्मा – 5 हजार 880 धावा
सुरेश रैना – 5 हजार 528 धावा
ए बी डीव्हीलियर्स – 5 हजार 162 धावा
महेंद्रसिंह धोनी – 5 हजार 4 धावा

चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.