आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) तिसऱ्या सामन्यात स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने होते. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात मुकाबला पार पडला. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना होता. चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात करत विजयी सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नईने हा विजय मिळवला. मुंबईने या सामन्यात पहिले बॅटिंग केली. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. त्यानंतर चेन्नईने 156 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईसाठी रचीन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रचीनने नाबाद 65 धावांची खेळी केली. तर ऋतुराजने 53 रन्स केल्या. तसेच चेन्नईसाठी 4 विकेट्स घेणाऱ्या नूर अहमद याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने मात केली आहे. चेन्नईने यासह या हंगामाची विजयाने सुरुवात केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 156 धावांचं आव्हान चेन्नईने 6 विकेट्स गमावून 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईने 158 धावा केल्या. रचीन रवींद्र याने सिक्स ठोकत चेन्नईला विजयी केलं.
मुंबईने चेन्नईला पाचवा झटका दिला आहे. विल जॅक्स याने सॅम करन याला बोल्ड केलं आहे. सॅम करन 4 धावा करुन माघारी परतला.
विघ्नेश पुथुर या युवा फिरकीपटूने तिसरी विकेट घेतली आहे. विघ्नेशने दीपक हुड्डा याला एस राजु याच्या हाती 3 धावांवर कॅच आऊट केल. चेन्नईने अशाप्रकारे चौथी विकेट गमावली.
विघ्नेश पुथुर याने ऋतुराज गायकवाड याच्यानंतर शिवम दुबे याला आऊट केलं आहे. शिवम दुबे 7 बॉलमध्ये 9 रन्स करुन कॅच आऊट झाला.
मुंबईने चेन्नईला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला विघ्नेश पुथुर याने 53 धावांवर विल जॅक्स याच्या हाती कॅच आऊट केलं.
चेन्नईने पावर प्लेनंतर 1 विकेट गमावून 62 रन्स केल्या आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. तर त्याआधी राहुल त्रिपाठी 2 धावा करुन आऊट झाला.
दीपक चाहर याने चेन्नईला पहिला झटका दिला आहे. दीपकने राहुल त्रिपाठीला 2 धावांवर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं.
चेन्नईच्या बॅटिंगला सुुरुवात झाली आहे. राहुल त्रिपाठी आणि रचीन रवींद्र ही सलामी जोडी मैदानात आली आहे. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे.
मुंबईने चेन्नईला 156 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या.
मुंबईला चेन्नईने आठवा झटका दिला आहे. मिचेल सँटनरने 11 धावा केल्या.
चेन्नईने मुंबईला सातवा झटका दिला आहे. नूर अहमद याने नमनला 17 धावावंर बोल्ड केलं.
मुंबईला मोठा झटका लागला आहे. मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. तिलक वर्मा आऊट झाला आहे. तिलकने 31 धावा केल्या.
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. रॉबिन मिन्झ 3 धावा करुन आऊट झाला आहे.
मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. तकॅप्टन सूर्यकुमार यादव 29 धावांवर आऊट झाला. सूर्यकुमारला महेंद्रसिंह धोनीने नूर अहमद याच्या बॉलिंगवर स्टंपिंग केलं.
मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. विल जॅक्स 11 धावा करुन माघारी परतला आहे. मुंबईची स्थिती 4.4 ओव्हरमध्ये 3 बाद 36 अशी झाली आहे.
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. रोहित शर्मानंतर रायन रिकल्टन माघारी परतला आहे. रायनने 13 धावा केल्या.
मुंबईची आयपीएलच्या 18 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात झाली आहे. मुंबईने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावली आहे. पलटणने धावांचं खातं उघडण्याआधीच विकेटचं खातं उघडलं. खलील अहमद याने रोहित शर्माला कॅच आऊट केलं. रोहितला भोपळाही फोडता आला नाही.
चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांचा हा 18 व्या मोसमातील पहिलाच सामना आहे. चेन्नईने या सामन्यात टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून रोहित शर्मा-रायल रिकेलटन सलामी जोडी मैदानात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.
चेन्नईने टॉस जिंकला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने मुंबईविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात अवघ्या काही मिनिटांनी 7 वाजता टॉस होणार आहे. टॉस कोण जिंकणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोपली, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राजा बावा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.
चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आयपीएलच्या 18 व्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं आणि सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार आहे.