मुंबई – आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील थरारक सामन्यामध्ये सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. संदीप शर्माने परफेक्ट यॉर्कमुळे अवघ्या 3 धावांनी राजस्थान संघाने विजय मिळवला. राजस्थानच्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 172 धावा करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्सचा आपल्या होम ग्राउंड चेपॉकवर चांगला रेकॉर्ड आहे. चेन्नईने या मैदानात 20 पैकी 17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला या मैदानात सामना जिंकणं कठीण आहे. पण राजस्थान रॉयल्सही चांगल्या फॉर्मात आहे.
चेन्नईने स्पर्धेतील पहिला सामना गुजरात विरुद्ध गमावल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. तर राजस्थानने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
पहिल्या सामन्यात हैदराबादला 72 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सकडून 5 धावांनी पराभव झाला. तर तिसऱ्या सामन्यात दिल्लीवर 57 धावांनी विजय मिळवला.
सीएसकेला 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज
जडेजा 8 नाबाद
धोनी 14 नाबाद
24 बॉलमध्ये 59 धावांची गरज
धोनीने एकाच संघासाठी 200 सामन्यात कर्णधारपद भूषविलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.त्याने मुंबई इंडियन्ससाठी 146 सामन्यात कर्णधारपद भूषविलं आहे. तर या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 140 सामन्यात आरसीबीचं कर्णधारपद भूषविलं आहे. तर गंभीरने 108 सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सचं नेतृत्व केलं आहे.
डेव्हॉन कॉनवेची अर्धशतकी खेळी, 37 बॉलमध्ये पूर्ण केलं. यामध्ये त्याने चौकार मारले. सलामीला आलेला डेव्हॉन कॉनवे खेळत होता मात्र अर्धशतक पूर्ण करताच त्याला चहलने कॅच आऊट केलं.
अॅडम जम्पाने मोईन अलीला बाद करत आणखी एक ट्विस्ट आणला आहे. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेला अंबाती रायडूही 1 धाव काढून माघारी परतला आहे. आती सीएसकेला 35 बॉलमध्ये 75 धावांची गरज आहे.
सीएसकेला 48स बॉलमध्ये 83 धावांची गरज असून डेव्हॉन कॉनवे नाबाद 40 मोईन अली 1 धाव काढून नाबाद आहेत.
3 ओव्हर 1 विकेट 16
सीएसकेला तिसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला आहे. फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाड याला संदीप शर्माने 8 धावांवर बाद केलं आहे. अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे.
सीएसकेचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड मैदानात
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाने 176 धावांचं आव्हान चेन्नईला दिलं आहे. राजस्थानकडून जोस बटलर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिमरॉन हेटमायरनेही 30 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. चेन्नईकडून रविंंद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकट्स घेतल्या. सीएसके महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली 200 वा सामना खेळत आहे.
16 ओव्हर 141- 4
जोस बटलरने 33 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारलाय.
जडेजाने केली कमाल
पड्डिकल बाद झाल्यावर आलेल्या कर्णधार संजू सॅमसनलाही शून्यावर आऊट करत जडेजाने सलग दुसरा झटका दिलाय.
CSK vs RR IPL 2023 Live Score |
राजस्थानला दुसरा धक्का बसला असून आक्रमक फलंदाजी करत असलेला देवदत्त पड्डिकल याला सर जडेजाने 38 धावांवर बाद केलं आहे.
पॉवर प्लेमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सहा ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावत 57 धावा केल्या आहेत. जोस बटलर 10 बॉल 17 धावा, देवदत्त पड्डिकल 18 चेंडूत 30 धावांवर नाबाद आहेत.
तुषार देशपांडेने चेन्नईला पहिलं यश मिळवून दिलं आहे. यशस्वीने झकास सुरूवात केली होती मात्र तुषारने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यशस्वी जयस्वाल 10 धावांवर आऊट झाला आहे.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग, डोनाव्हॉन फरेरा, केएम आसिफ, अॅडम झम्पा, जो रूट
चेन्नई सुपर किंग्ज : अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, राजवर्धन हंगरगेकर
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग
CSK vs RR IPL 2023 Live Score |
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.