CSK vs SRH IPL Live Score : चेन्नई संघाचा हैदराबादवर सुपर विजय, कॉनवेची आक्रमक अर्धशतकी खेळी

| Updated on: Apr 21, 2023 | 11:36 PM

CSK vs SRH IPL 2023 Live Score Updates : आयपीएलमधील 29वा सामना सीएसके आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात धोनी अँड कंपनीला नमवण्याचं हैदराबादसमोर आव्हान असणार आहे.

CSK vs SRH IPL Live Score : चेन्नई संघाचा हैदराबादवर सुपर विजय, कॉनवेची आक्रमक अर्धशतकी खेळी
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये 29 वा सामना काही वेळा सुरू होणार आहे. या सामन्याआधी जर पॉइंटटेबलवर एक नजर मारली तर चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद हा संघ नव्या स्थानावर असून दोन्ही संघांनं आपलं स्थान मजबूत करण्याची समसमान संधी आहे.

चेन्नई सुपर किंग्ज स्क्वॉड :

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, आकाश सिंग, मथीशा पथिराना, सिमारेषा सोनिया, आकाश सिंग , महेश थेक्षाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगला

सनरायझर्स हैदराबाद स्क्वॉड :

अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, अदिल कुमार, मायकेन, मार्कोस, मार्को. , विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र सिंग यादव, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, अकेल होसेन, अनमोलप्रीत सिंग

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 21 Apr 2023 11:14 PM (IST)

    सीएसकेचा सुपर विजय

    CSK vs SRH IPL Live Score :

    चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्ये सीएसकेने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. हैदराबाद संघाच्या 135 धावांचा पाठलाग करताना सीएसकेने 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. एकतर्फी सामन्यामध्ये डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2023 10:17 PM (IST)

    ऋतुराज आऊट

    CSK vs SRH IPL Live Score :

    ऋतुराज गायकवाड 35 धावा करून रन आऊट झाला असून संघाला पहिला धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे.


  • 21 Apr 2023 10:11 PM (IST)

    कॉनवेचं अर्धशतक

    CSK vs SRH IPL Live Score :

    डेव्हॉन कॉनवे याने 34 बॉलमध्ये 50 धावा करत अर्धशतक केलं आहे. पॉवर प्ले मध्ये त्याने आक्रमक फटकेबाजी केली त्यानंतरही त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

  • 21 Apr 2023 09:55 PM (IST)

    चेन्नईची दमदार सुरूवात, गायकवाड, कॉनवेने फोडलं

    CSK vs SRH IPL Live Score :

    सनराइजर्स हैदराबाद संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची दमदार सुरूवात झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये बिनबाद 60 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने 12 बॉलमध्ये 18 धावा केल्या आहेत. तर डेव्हॉन कॉनवे याने 24 बॉलमध्ये 40 धावा केल्या आहेत.

  • 21 Apr 2023 09:09 PM (IST)

    चेन्नईला विजयासाठी 135 धावांचं आव्हान

    प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर जडेजाने चेन्नईकडून 3 विकेट्स घेतल्या.

  • 21 Apr 2023 08:36 PM (IST)

    हैदराबाद संघाला लागोपाठ धक्के

    CSK vs SRH IPL Live Score

    हैदराबाद संघाला लागोपाठ धक्के बसले असून संघाची अवस्था 95-5 अशी झाली आहे. रविंद्र जडेजाने तीन विकेट मिळवत मयंक अग्रवाल याला बाद करत आहे. अवघ्या 2 धावा करून परतला आहे.

  • 21 Apr 2023 08:31 PM (IST)

    मार्करम आऊट

    CSK vs SRH IPL Live Score

    हैदराबाद संघाला चौथा धक्का बसला आहे. महेश तीक्ष्णाने संघाला यश मिळवून दिलं आहे. हैदराबादच्या कर्णधाराला 12 धावांवर माघारी पाठवलं आहे.

  • 21 Apr 2023 08:26 PM (IST)

    सर जड्डूची कमाल

    CSK vs SRH IPL Score :

    रविंद्र जडेजाने संघाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. राहुल त्रिपाठी याला 21 धावांवर जडेजाने आऊट करत हैदराबादला तिसरा धक्का दिला आहे. आता मैदानात क्लासेन उतरला आहे.

  • 21 Apr 2023 08:17 PM (IST)

    अभिषेक शर्मा माघारी

    CSK vs SRH IPL Live Score :

    रविंद्र जडेजाने सलामीवीर अभिषेक शर्मा याला आऊट केलं आहे. अजिंक्य रहाणेने 34 धावांवर त्याचा कॅच पकडत संघाला दुसरं यश मिळवून दिलं आहे. ब्रुक बाद झाल्यावर त्रिपाठी आणि शर्मा दोघांची भागीदारी पाहायला मिळत होती मात्र सर जडेजाने ब्रेक लावला आहे.

  • 21 Apr 2023 08:02 PM (IST)

    पॉवर प्ले

    CSK vs SRH IPL Live Score :

    हैदराबाद संघाने पॉवर प्लेमध्ये 45 धावा केल्या आहेत. तर हॅरी ब्रूक आऊट झाला आहे. अभिषेक शर्मा नाबाद 24 आणि राहुल त्रिपाठी नाबाद 1 मैदानात आहेत.

  • 21 Apr 2023 07:54 PM (IST)

    आकाश सिंगचा पहिला धक्का

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    हैदराबाद संघाला पॉवर प्लेमध्ये पहिला गडी गमावला आहे. हॅरी ब्रूक याला 18 धावांवर असातान आकाश सिंगने बाद केलं आहे. ऋतुराज गायकवाड याने कमाल कॅच घेतला.

  • 21 Apr 2023 07:30 PM (IST)

    हैदराबाद संघाकडून सलामीमध्ये बदल

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    हैदराबाद संघाकडून सलामीमध्ये बदल करण्यात आला आहे. सलामील हॅरी ब्रुक आणि अभिषेक शर्मा आला आहे. मयंक अग्रवाल याच्या जागी त्याला सलामीला उतरवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.

  • 21 Apr 2023 07:22 PM (IST)

    ‘काश्मीर एक्सप्रेस’ परतली

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    सनराइजर्स हैदराबाद संघाने ‘काश्मीर एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिक याला अंतिम 11 मध्ये संधी दिली आहे.

  • 21 Apr 2023 07:08 PM (IST)

    सनरायझर्स हैदराबाद Playing 1

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :


    सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन)
    : हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक

  • 21 Apr 2023 07:06 PM (IST)

    चेन्नई सुपर किंग्ज Playing 11

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना

  • 21 Apr 2023 07:05 PM (IST)

    माहीने टॉस जिंकला

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    महेंद्रसिंह धोनी याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे .

  • 21 Apr 2023 06:22 PM (IST)

    हेड टू हेड रेकॉर्ड

    CSK vs SRH IPL 2023 Live Score :

    चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीचा विक्रम यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिले तर .दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले आहेत. यामधील CSKने 13 सामने जिंकले आहेत, तर SRH ला फक्त 5 सामने जिंकता आले आहेत.