नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता.
प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला.
एका क्षणी मिलर आणि डी कॉक भारताकडून हा सामना हिसकावून घेतील असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 106 धावा केल्या. पण, भारताच्या विजयानं त्या व्यर्थ ठरल्या. डेव्हिड मिलरने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. मिलरने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले.
A brilliant hundred from Miller ??#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/hMlJxs4OjI
— ICC (@ICC) October 2, 2022
गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकातच संघाने दोन विकेट गमावल्या.
क्विंटन डी कॉक आणि मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली.मार्करामला अक्षर पटेलने क्लीन बोल्ड केले, त्याने 19 चेंडूत 33 धावा केल्या.
डी कॉक 48 चेंडूत 69 धावा करून नाबाद राहिला.डी कॉक आणि मिलरने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 37 धावांची गरज होती आणि मिलरने शेवटच्या षटकात अक्षर पटेलविरुद्ध दोन षटकार मारत शतक ठोकले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 237 धावा केल्या. रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली.
रोहित 37 चेंडूत 43 धावा करून बाद झाला.त्याचवेळी केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली.त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.