बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 18 व्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलिया टीमकडून बॅटिंगसाठी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने सावध सुरुवात करत नंतर टॉप गिअर टाकला. पाकिस्तानने पहिल्याच बॉलवर रिव्हीव्यू गमावला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये उसामा मीर याने वॉर्नरची कॅच सोडत जीवनदान दिलं. वॉर्नरने या संधीचं सोनं करत धमाका केलाय. वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. वॉर्नरने य शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वॉर्नरच्या वनडे कारकीर्दीतील हे 21 वं शतक ठरलं. डेव्हिड वॉर्नर याने 85 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वॉर्नरने या दरम्यान 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले. वॉर्नरचं हे वर्ल्ड कपमधील एकूण 5 वं शतक आहे. वॉर्नर वर्ल्ड कपमध्ये वेगवान 5 अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने 22 डावांमध्ये हा कारमाना केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं केली आहेत. पॉन्टिंगला यासाठी 42 डाव खेळावे लागले होते.
दरम्यान डेव्हिड वॉर्नर याला ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. वॉर्नर 10 धावांवर खेळत होता. तर शाहीन शाह अफ्रिदी बॉलिंग करत होता. वॉर्नरने तिसऱ्या बॉलवर मारलेला फटका उंच गेला. उसामा मीर याच्यासाठी सोपा कॅच होता. मात्र मीरने नीट जज न केल्याने कॅच ड्रॉप झाला. मीरची एका चुकीचा फटका पाकिस्तानला फार महागात पडला. तर वॉर्नरने या जीवनदानाचा फायदा घेत शतक केलं. आता वॉर्नर आणखी किती धावा करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल.
वॉर्नरची वादळी खेळी
David Warner’s 21st ODI century leads the Australia charge in Bengaluru 🔥@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #PAKvAUS pic.twitter.com/Zn54v1Hqm2
— ICC (@ICC) October 20, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.