मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 14 वा सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर तरची लढाई आहे. दोन्ही संघांची आतापर्यंत स्पर्धेत सुमार कामगिरी राहिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमध्ये होतं आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी केली. पण यानंतर ऑस्ट्रेलियाने चांगलं कमबॅक केलं. मागच्या चुकांमधून धडा घेत चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ऑस्ट्रेलियाने मागच्या सामन्यात 6 झेल सोडले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्याचबरोबर सलग दोन पराभवामुळे गुणतालिकेत तळ गाठला आहे. आता डेविड वॉर्नरने दोन अप्रतिम झेल घेतले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडण्यात यश मिळवलं. पथुम निसांकाला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. पण यात मोलाची साथ लाभली ती डेविड वॉर्नरची..डेविड वॉर्नरने पहिल्यांदा निसांका आणि त्यानंतर कुसल मेंडिस याचा जबरदस्त झेल घेतला. मागच्या चुकांमधून धडा घेत जखमांवर फुंकर घालण्याचं काम या माध्यमातून केल्याचं बोललं जात आहे.
💥 Brilliant catch by David Warner 💪💯💯💯. #CricketTwitter #CricketWorldCup pic.twitter.com/sqAFmPcb1o
— sowaid zada khan (@ZadaSowaid24423) October 16, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहा झेल सोडल्याने टीका झाली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. आता डेविड वॉर्नरने ओल्या जखमा भरण्याचं कामं केलं. निसांकाचा झेल ऑन साईडला पकडला. स्केअर शॉटवर वर डाव्या बाजूला धाव जात उडी घेतली आणि झेल पकडला. त्यानंतर कुसल मेंडिस यांची डीप स्क्वेअर लेगला झेल पकडला आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हा झेल घेतना डेविड वॉर्नरला थोडी जखम झाली. पण त्याने मैदान सोडलं नाही.
David Warner took Kusal Mendis' catch despite his knee sticking in the ground.#AUSvsSL #CWC23 #Springboks #LoveIsBlind #ENGvsAFG
📷ICC/Getty pic.twitter.com/bFZqTHbcLD
— Johny Bava (@johnybava) October 16, 2023
निसांका आणि मेंडिस यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. बिनबाद 125 धावांची भागीदारी असताना 178 धावांपर्यंत 5 गडी तंबूत परतले. 53 धावांवर 5 गडी बाद झाले. एडम झाम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क याने एक विकेट घेतली.