मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाचा अवघ्या काही दिवसांनी श्रीगणेशा होणार आहे. मोसमातील पहिला सामना हा 31 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. सर्व संघ तयारीला लागले आहेत. एक एक करुन सर्व खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले जात आहेत. दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार ऋषभ पंत याला अपघातामुळे आयपीएलच्या 16 व्या पर्वात खेळता येणार नाही. त्यामुळे पंतच्या जागी विकेटकीपर म्हणून कोणाचा समावेश केला जाणार, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात आहे. दिल्ली टीमकडे काही खेळाडू आहेत, जे विकेटकीपर म्हणून पाचव्या स्थानी बॅटिंग करु शकतात आणि पंतची जागा घेऊ शकतात. टीमचा हेड कोच रिकी पॉन्टिंग याने काही खेळाडूंची नावं सांगितली आहेत, जे पंतची जागा घेऊ शकतात.
दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीमचा कॅप्टन बदलला आहे. टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अपघातामुळे आता ती जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याला देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी वॉर्नरने टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.
“मला ही जबाबदारी दिली, मला त्यासाठी पात्र समजलं, यासाठी मी टीम मॅनेजमेंटचा आभारी आहे. ऋषभ हा उत्कृष्ठ लीडर होता. त्याला आम्ही सर्व या मोसमात मिस करु”, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.
वॉर्नरकडे कर्णधारपद असल्याने तो ओपनिंग करणार असल्याचं निश्चित आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत मिचेल मार्श ओपनिंग करताना दिसू शकतो, असं पॉन्टिंग म्हणाला. त्यामुळे मार्श आणि वॉर्नर ही जोडी ओपनिंग करु शकते.
टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.