आयपीएल 2024 मधील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओपनिंगला आलेल्या पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरूवात केली. सीएसकेच्या गोलंदाजांना सुरूवातीला काही यश मिळवून दिलं नाही. दिल्लीचे दोन्ही सलामीवीर मैदानावर सेट झाले होते, विकेट काही मिळत नव्हती. मात्र पथिराना याने डेव्हिड वॉर्नर याचा हवेत उडी मारत अफलातून झेल घेतला. हा कॅच पाहून धोनीनेही टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
WHAT A CATCH!
This blinder from Pathirana was perhaps the only way to stop David Warner today! A Wicket that should be credited solely to the fielder!
Dhoni, Tushar Deshpande, Deepak Chahar all seem likely to bat today! #CSKvsDC #DCvsCSKpic.twitter.com/sthggPbAbM— Pranav Pratap Singh (@PranavMatraaPPS) March 31, 2024
सीएसकेला दिल्लीची विकेट काही मिळत नव्हती. कॅप्टनने पर्पल कॅप होल्डर मुस्तफिजुर रहमान याच्याकडे चेंडू सोपवला. दहाव्या ओव्हरमधील तिसऱ्याच चेंडूवर वॉर्नर याने मागे बॉल मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची कट घेऊन चेंडू चौकारच जाणार असं वाटत होतं. मात्र फिल्डिंग करत असलेल्या पथिराना याने हवेत उडी मारत कॅच घेतला.
डेव्हिड वॉर्नर याने 34चेंडूत 52 धावा केल्या, यामध्ये 3 सिक्स आणि 5 चौकार मारले. सेट झालेल्या वॉर्नरला पथिरानाच्या कॅचमुळे माघारी जावं लागलं. कॅच पकडल्यावर पठ्ठ्याने एकाच ओव्हरमध्ये मिचेल मार्श आणि स्टब्स यांना घातक यॉर्कर टाकत माघारी पाठवलं.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (WK), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (C), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (WK), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान.