नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमात आज 20 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. तर डबल हेडरमधील दुसऱ्या रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स टीमने कोलकाता नाईट रायडर्स टीमवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांचा हा सहावा सामना होता. केकेआरने पहिले बॅटिंग करताना दिल्लीला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हा सामना 4 विकेट्सने गमावला. मात्र केकेआरने दिल्लीला सहजासहजी विजय होऊन दिलं नाही. केकेआरच्या गोलंदाजांनी 19.1 ओव्हरपर्यंत 128 धावांचा बचाव करण्याा शानदार बचाव केला. मात्र 20 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दिल्लीने विजय मिळवलाच. दिल्लीचा हा या मोसमातील पहिलावहिला विजय ठरला. तर केकेआरचा हा आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यातील तिसरा पराभव ठरला. तर दिल्लीला सलग पाच सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर पहिला विजय मिळाला.
दिल्ली कॅपिट्ल्सने अखेर कोलकाता नाईट रायडर्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने विजयासाठी दिलेलं 128 धावांचं आव्हान दिल्लीने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
लो स्कोअरिंग सामना केकेआरने शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि ललित यादव खेळत आहेत. तर केकेआरकडून कुलवंत खेजरोलिया लास्ट ओव्हर टाकत आहे.
लो स्कोअरिंग सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने सहावी विकेट गमावली आहे. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आऊट झआला आहे. वॉर्नरने 41 बॉलमध्ये 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
दिल्ली कॅपिट्ल्सने झटपट 2 विकेट गमावले आहेत. मिचेल मार्श याच्यानंतर फिलिप सॉल्ट ही आऊट झाला आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सने चांगल्या सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. पृथ्वी शॉ 13 धावा करुन बाद झाला. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर आणि शॉ या दोघांनी 38 धावा जोडल्या.
DC vs KKR IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिट्ल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी मैदानात आहे. दिल्ली विजयासाठी केकेआरने 128 धावांचं आव्हान दिलं आहे.
पंजाब: मानसामध्ये सिमला मिरचीच्या दरात किलोमागे 1 ते 1.5 रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची पिके रस्त्यावर फेकली.
#WATCH पंजाब: मनसा में शिमला मिर्च का मूल्य 1-1.5 रुपये प्रति किलो तक गिरने के बाद गुस्साए किसानों ने अपनी फसल सड़कों पर फेंकी। pic.twitter.com/5NqFXiQapy
— ANI_HindiNews (@AHindinews) April 20, 2023
कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 127 धावा केल्या. केकेआरकडून ओपनर जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने नाबाद 38 धावांचं योगदान दिलं. मनदीप सिंह याने 12 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्ती याने नाबाद 1* रन केली. दिल्ली कॅपिट्ल्सकडून इशांत शर्मा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्तजे या चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
कुलदीप यादव याने एकाच ओव्हरमध्ये केकेआरला 2 झटके दिले आहेत. कुलदीपने आधी जेसन रॉय आणि अनुकूल रॉय या दोघांना आऊट केलं.
केकेआर एकामागोमाग एक विकेट टाकत आहे. आता रिंकू सिंह याच्यानंतर सुनील नारायण आऊट झाला आहे.
केकेआरचा स्टार बॅट्समन रिंकू सिंह 9 धावा करुन माघारी परतला आहे. केकेआरने पाचवी विकेट गमावली आहे.
केकेआरला चौथा झटका लागला आहे. मनदीप सिंह फटका मारण्याच्या नादात बोल्ड झाला आहे. यामुळे केकेआर बॅक फुटवर ढकलली गेली आहे.
इशांत शर्मा याने दोन वर्षांच्या कमबॅकनंतर केकेआरचा कॅप्टन नितीश राणा याला आऊट केलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का लागला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गेल्या सामन्यात केकेआरसाठी 15 वर्षांनी शतक ठोकणारा वेंकटेश अय्यर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भोपळाही फोडू शकला नाही.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिली विकेट गमावली आहे. लिटॉन दास 4 धावा करुन आऊट झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सकडून लिटॉन दास आणि जेसन रॉय ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, मनीष पांडे, फिल सॉल्ट, ललित यादव, अमन खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.
केकेआर प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, लिटॉन दास, जेसन रॉय, सुनील नरेन, रिंकू सिंह, मंदीप सिंह, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव आणि कुलवंत खेजरोलिया.
पावसामुळे तब्बल 78 मिनिटं टॉसला उशीर झाला. अखेर टॉस दिल्ली कॅपिट्ल्सने जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता केकेआर दिल्लीला विजयासाठी किती धावांचं आव्हान देतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याआधी टॉसला विलंब झाला आहे. टॉस संध्याकाळी 7 वाजता होतो. मात्र अरुण जेटली स्टेडियममध्ये अजूनही पावसामुळे टॉस झालेला नाही.
पावसामुळे टॉसला विलंब
? Update from Delhi ?
Toss delayed due to rain.
Pitch inspection at 7:00 PM IST #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/mD0d3lCeeu
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील 28 वा सामना पार पडणार आहे. दिल्लीचा हा सामना जिंकून पहिल विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.