नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 13 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. आता दुसऱ्या आणि मोसमातील 59 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्सने 31 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला पंजाबच्या भेदक माऱ्यासमोर 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 136 धावाच करता आल्या.
पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 31 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला चांगल्या सुरुवातीनंतरही 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावाच करता आल्या. या पराभवामुळे दिल्लीचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलंय. तर पंजाबने विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे.
दिल्लीला आठवा झटका लागला आहे. प्रवीण दुबे 16 धावांवर आऊट झाला आहे.
दिल्लीने पंजाबच्या फिरकी समोर सपशेल नांगी टाकली आहे. दिल्लीने सहावी विकेट गमावली आहे. मनीष पांडे आला तसाच गेला. मनीषला भोपळाही फोडता आला नाही.
पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी धमाका केलाय. दिल्लीला चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी सुरुंग लावलाय. पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी 17 बॉलमध्ये दिल्ली 5 झटके दिले आहेत.
दिल्लीने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 54 धावांची अर्धशतकी खेळी केल्यानंतर आऊट झाला आहे. हरप्रीत ब्रार यानेच वॉर्नरला एलबीडबल्यू आऊट केला. ब्रारची ही तिसरी विकेट ठरली.
दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. रायली रुसो 5 धावांवर कॅच आऊट झाला आहे. यासह पंजाब किंग्सने सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे.
राहुल चाहर याने दिल्लीला दुसरा धक्का दिला आहे. राहुलने मिचेल मार्श याला 3 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे. वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीतील 60 वं अर्धशतक ठरलं आहे. तसेच वॉर्नरने पंजाब विरुद्ध 1 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
हरप्रीत ब्रार याने दिल्ली कॅपिट्ल्सची जमलेली सलामी जोडी तोडली आहे. हरप्रीतने फिलिप सॉल्ट याला 21 धावांवर क्लिन बोल्ड करत पंजाबला ब्रेक थ्रू मिळवून दिला.
दिल्ली कॅपिट्ल्सची शानदार सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 53 धावा करत सलामी अर्धशतकी भागीदारी साकारली.
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवा झाली आहे. दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान आहे. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट ही सलामी जोडी खेळत आहे.
पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. पंजाबकडून प्रभासिमरन सिंह याने सर्वाधिक 103 धावा केल्या. सॅम करन याने 20 तर सिंकदर रजा याने नाबाद 11 धावा केल्या. या दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि मुकेश कुमार या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
प्रभासिमरन सिंह शतक ठोकल्यानंतर आऊट झाला आहे. प्रभाने 65 बॉलमध्ये 6 सिक्स 10 फोरच्या मदतीने 103 धावा केल्या. प्रभाचं हे आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक ठरलं.
प्रभासिमरन सिंह याने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं आहे. प्रभासिमरन सिंह याने अवघ्या 61 बॉलमध्ये 102 धावांची शतकी खेळी केली. प्रभासिमरन पंजाबकडून शतक ठोकणारा 14 वा तर तिसरा अनकॅप्डन बॅट्समन ठरला आहे. पॉल वॅलथॅटी आणि शॉन मार्श यांच्यानंतर प्रभासिमरन तिसरा अनकॅप्ड बॅट्समन ठरला आहे.
पंजाबने पाचवी विकेट गमावली आहे. हरप्रीत ब्रार 2 धावा करुन आऊट झाला आहे.
पंजाबला मोठा झटका लागला आहे. पंजाबने चौथी विकेट गमावली आहे. सॅम करन 20 धावा करुन माघारी परतला आहे.
प्रभासिमरन सिंह याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. प्रभासिमरन याचं हे आयपीएल 16 व्या मोसमातील दुसरं अर्धशतक ठरलंय. प्रभासिमरन याच्या अर्धशतकामुळे पंजाबचा डाव सावरला आहे.
पंजाब किंग्स पावर प्लेमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे. पंजाबची पावर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावण्याची चौथी वेळ ठरली आहे. अक्षर पटेल याने जितेश शर्मा याला आऊट करत पंजाबला तिसरा धक्का दिला आहे. त्यामुळे पंजाबची 5.4 ओव्हरमध्ये 3 बाद 45 अशी स्थिती झाली आहे.
इशांत शर्मा याने पंजाब किंग्सला दुसरा झटका दिला आहे. इशांतने लियाम लिविंगस्टोन याला 4 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे.
पंजाब किंग्सने मोठी विकेट गमावली आहे. इशंता शर्मा याने आपल्या 100 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याला 7 धावांवर आऊट केलं आहे.
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभासिमरन सिंह आणि कॅप्टन शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स दिल्लीला घरच्या मैदानात किती धावांचं आव्हान देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स या मोसमात प्रथमच आमनेसामने आहेत. याआधी आयपीएलमध्ये दोघांमध्ये 30 वेळा सामना झाला आहे. यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ राहिले आहेत. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स हे दोन्ही संघ या मोसमात पहिल्यांदा आमनेसामने असणार आहेत. दिल्लीचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलंय. मात्र पंजाबला अजूनही संधी आहे. त्यामुळे पंजाबला दिल्लीपासून जपून रहावं लागणार आहे. पंजाबचा हा सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.