Virat Kohli | ‘रनमशीन’ कोहली! आयपीएलमध्ये ‘विराट’कामगिरी करणारा पहिलाच बॅट्समन

| Updated on: May 06, 2023 | 9:00 PM

विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. विराट कोहली आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारा एकुलता एक बॅट्समन ठरला आहे.

Virat Kohli | रनमशीन कोहली! आयपीएलमध्ये विराटकामगिरी करणारा पहिलाच बॅट्समन
Follow us on

नवी दिल्ली | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल 16 व्या सिजनमधील 50 वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकला. आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विराट कोहली आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. विराटने नक्की काय केलंय, हे जाणून घेऊयात.

विराटने आयपीएल कारकीर्दीत 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने यासह 7 हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज हा बहुमान मिळवला आहे. विराटला या सामन्याआधी 7 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 12 धावांची गरज होती. विराटने दिल्ली विरुद्ध 12 वी धाव घेताच त्याने हा कीर्तीमान रचला.

किंग विराट कोहली

अर्धशतकांचं अर्धशतक

दरम्यान विराटने दिल्ली विरुद्ध 46 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. विराट यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटच्या नावावर 50 अर्धशतकांची नोंद आहे. तर या यादीत डेव्हिड वॉर्नर हा 59 अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा

विराट कोहली – 7 हजार 38 धावा*

शिखर धवन – 6 हजार 536 धावा

डेव्हिड वॉर्नर – 6 हजार 189 धावा

रोहित शर्मा – 6 हजार 63 धावा

सुरेश रैना – 5 हजार 528 रन्स

विराट कोहली याची आयपीएल कारकीर्द

विराट कोहली याने आतापर्यंत आयपीएल इतिहासात 232 सामन्यांमधील 224 डावात 36.59 च्या सरासरी आणि 129.58 या स्ट्राईक रेटने 6 हजार 988 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 49 अर्धशतकं आणि 5 शतकं ठोकली आहेत. विराटची 113 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.