आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद टीमने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध इतिहास रचला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी बोलावलं. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक आणि ट्रेव्हिस या दोघांनी 2.4 ओव्हरमध्येच 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर पुढील 2 बॉलनंतर ट्रेव्हिस हेडने 16 बॉलमध्ये आयपीएलमधील हैदराबादसाठी संयुक्तरित्या वेगवान अर्धशतक ठोकलं. हेडने आपला ओपनर पार्टनर अभिषेक शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली.
ट्रेव्हिस हेड अर्धशतकानंतर एका बाजूने जोरदार फटकेबाजी करत होता. हेड मैदानात चौफेर फटके मारत होता. तर अभिशेक शर्मा हा देखील टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत होता. या दोघांनी हैदराबादसाठी 5 ओव्हरमध्येच शतकी भागीदारी पू्र्ण केली. हैदराबादच्या नावावर 5 ओव्हरमध्ये बिनबाद 103 धावा झाल्या. या शतकी भागीदारीत हेडचं 62 आणि अभिषेकच्या 40 धावांचं योगदान राहिलं. त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये या दोघांनी 22 धावा जोडल्या.
हैदराबादने अशाप्रकारे पावरप्लेमधील 6 षटकांमध्ये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. हैदराबादच्या नावावर पावर प्लेनंतर 125 धावांची नोंद झाली. हैदराबादच्या अभिषेक आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने केकेआरचा रेकॉर्ड ब्रेक केला. केकेआरने आरसीबी विरुद्ध 2017 साली बिनबाद 107 धावा केल्या होत्या. पावरप्लेच्या या 6 ओव्हरमध्ये ट्रेव्हिस हेडने 26 बॉलमध्ये 11 चौकार आणि 6 सिक्ससह 328.08 च्या स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या. तर अभिषेकने 10 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 400 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या.
अभिषेक शर्मा-ट्रेव्हिस हेडची पावरफुल कामगिरी
Adding the POWER in powerplay 🔥🔥
125 runs in 6 overs ft. Abhishek Sharma & Travis Head 👌👌
WATCH 🎥🔽 #TATAIPL | #DCvSRH | @SunRisershttps://t.co/mxSQqI14qF
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
दिल्ली प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.