ट्रेव्हिस हेड याच्या 89 आणि संदीप शर्माच्या 46 धावांच्या मदतीने सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं. ट्रेव्हिस हेड याने या 89 धावांच्या खेळीदरम्यान 16 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. हेड हैदराबादसाठी संयुक्तरित्या वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. हेडने आपला सहकारी अभिषेक शर्मा याच्या विक्रमाची बरोबरी केली. अभिषेकने मुंबई इंडियन्स विरुद्ध 16 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. मात्र दिल्लीच्या एका युवा फलंदाजाने एका झटक्यात हेड आणि अभिषेकचा रेकॉर्ड ब्रेक केला.
हैदराबाद विरुद्ध 267 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला 16 धावांवर पहिला झटका लागला. पृथ्वी शॉ 16 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर जेक फ्रेझर-मॅकगर्क मैदानात आला. जेक फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या 15 बॉलमध्ये तडाखेदार अर्धशतक ठोकलं. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने यासह अभिषेक आणि ट्रेव्हिसला मागे टाकलं. तसेच जेक फ्रेझर-मॅकगर्क हा आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करणारा चौथा फलंदाज ठरला. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 15 बॉलमध्ये 5 सिक्स आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने 353.33 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा ठोकल्या.
जेक फ्रेझर-मॅकगर्क अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झाला. जेक फ्रेझर-मॅकगर्क टॉप गिअर टाकत फटकेबाजी करायला घेतली. त्याच्या खेळीमुळे दिल्लीच्या आशा वाढल्या. मात्र मयंक मार्कंडने जेक फ्रेझर-मॅकगर्क याला रोखलं. मयंकने जेक फ्रेझर-मॅकगर्क याला 65 धावांवर विकेटकीपर हेन्रिक क्लासेन याच्या हाती कॅच आऊट केलं. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 18 बॉलमध्ये 5 चौकार आणि 7 सिक्ससह 65 धावांची खेळी केली.
जेक फ्रेझर-मॅकगर्कची वादळी खेळी
Playing fire with fire in the Powerplay! 🔥🔥
Jake Fraser McGurk departs after an entertaining 65(18) 🙌#DC 109/3 after 7 overs.
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/iACgfhytou
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.